मुंबईः देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यानं सरकारी यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केल्यानुसार देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. देशावर आलेल्या आपत्तीचा सामना करण्यासाठी राज्यांकडूनही उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या मंत्रिमंडळानं आज मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात करण्याचा ठाकरे सरकारनं निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य, लोकप्रतिनिधींच्या वेतनात या महिन्यापासून म्हणजे एप्रिल 2020 पासून पुढील वर्षापर्यंत म्हणजे एप्रिल 2021 पर्यंत 30 टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय झाला.
CoronaVirus : राज्यातील आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात, ठाकरे सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 16:16 IST
राज्यातील आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात करण्याचा ठाकरे सरकारनं निर्णय घेतला आहे.
CoronaVirus : राज्यातील आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात, ठाकरे सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय
ठळक मुद्दे देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यानं सरकारी यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. राज्यातील आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात करण्याचा ठाकरे सरकारनं निर्णय घेतला आहे.