CoronaVirus 3 corona patients found Dahisar | CoronaVirus दहिसरला सापडले कोरोनाचे 3 रुग्ण

CoronaVirus दहिसरला सापडले कोरोनाचे 3 रुग्ण

मनोहर कुंभेजकर
मुंबई--   कोरोगाचे लोण आता पश्चिम उपनगरात पसरू लागले आहे.दहिसर (पूर्व) येथील शैलेंद्र नगर येथील मधुसूदन सोसायटीत कोरोनाचे २ तर आंबेवाडी येथील वाल्मिकी चाळ येथे १ कोरोना  रुग्ण सापडला आहे.विशेष म्हणजे सदर कोरोनाग्रस्त हे येथीलच रहिवासी असून कम्युनिटीतून त्यांना  कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आर (उत्तर) येथील साहय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत लोकमतला माहिती दिली.

 येथे कोरोना रुग्ण सापडल्याने कोरोना विषाणूची बाधा होऊ नये यासाठी हा परिसर लॉक डाऊन केला आहे.पालिकेने शैलेंद्र नगर येथील मधुसूदन सोसायटीतील राहणाऱ्या 36 नागरिकांना आणि 
आंबेवाडीतील वाल्मिकी चाळ व १ सोसायटी मधील नागरिकांनी घराबाहेर पडणे आणि बाहेरच्या नागरिकांनी येथे प्रवेश करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.जर या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: CoronaVirus 3 corona patients found Dahisar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.