मुंबई : मुंबईत शुक्रवारी दिवसभरात तब्बल १११० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे आतापर्यंत ८० टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात १,९२९ नवे रुग्ण आढळले असून ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींचा आकडा ७,७९६ इतका आहे.कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी पुन्हा कमी होऊन ७७ दिवसांवर आला आहे. तसेच रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.७५ टक्क्यांवरून ०.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण बाधित रुग्णांचा आकडा एक लाख ५२ हजार २४ एवढा आहे. पालिकेच्या अहवालानुसार सध्या २२, २२० सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत एकूण एक लाख २१ हजार ६७१ रुग्ण बरे झाले आहेत.नाना पटोले यांना कोरोनाची लागणभंडारा : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी टिष्ट्वट करून ही माहिती दिली. ते मुंबई येथे होम क्वॉरंटाइन असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. शुक्रवारी मुंबई येथील चित्रकुट या त्यांच्या शासकीय निवासस्थानी घेतलेला नमूना पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली.
coronavirus: मुंबईत दिवसभरात कोरोनाचे १,९२९ रुग्ण, तर ३५ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 04:23 IST