Join us
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : राज्यातील १५ पॉझिटिव्ह रुग्ण झाले कोरोनामुक्त!, लवकरच या रुग्णांना मिळणार डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 05:28 IST

Coronavirus : राज्यात मंगळवारी कोरोनाबाधितांचा आकडा १०७ वर पोहोचला आहे. एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत असताना रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदी पालिकेचे कर्मचारी, अधिकारी रुग्ण बरे कसे होतील यासाठी प्रयत्न करत आहेत.

मुंबई : डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील विविध रुग्णालयातील १२ रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाले आहेत. या विषाणूची लागण होऊ नये म्हणून सामान्यांनी घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊ नये तसेच विषाणूची लागण झाल्यास थेट रुग्णालयात भरती व्हावे, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.राज्यात मंगळवारी कोरोनाबाधितांचा आकडा १०७ वर पोहोचला आहे. एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत असताना रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदी पालिकेचे कर्मचारी, अधिकारी रुग्ण बरे कसे होतील यासाठी प्रयत्न करत आहेत. पालिकेकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना चांगलेच यश आले आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाची लागण झालेल्या १२ रुग्णांना बरे करण्यात आले आहे. त्यांच्या चाचण्यांमध्ये ते कोरोना निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य विभागाला रुग्णांना बरे करण्यात यश आले आहे. केंद्र आणि राज्य सरकाराच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या १५ रुग्णांना लवकरच डिस्चार्ज दिला जाईल़असा होतो रुग्ण निगेटिव्हकोरोनाची लागण झालेला किंवा ज्याला लागण झाल्याचे संशय आहे, अशा रुग्णाला रूग्णालयात दाखल केले जाते. स्वॅबच्या साहाय्याने रुग्णाच्या घशातील लाळ घेऊन त्याची तपासणी करण्यात येते. त्यात तो रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्यावर उपचार केले जाते. रुग्णाला १४ दिवस रुग्णालयात ठेवले जाते.या कालावधीत त्या रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवली जाते. त्याला ताप, सर्दी, खोकला झाल्यास आवश्यक ती औषधे दिली जातात. या दरम्यान रुग्णाची अनेकदा तपासणी करण्यात येते. रुग्णाच्या दोन चाचण्या लागोपाठ निगेटिव्ह आल्यास तो रुग्ण बरा झाला आहे, असे समजले जाते.कस्तुरबातील आठ जणांना घरी सोडलेमुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील आठ रुग्ण कोरोना विषाणुमुक्त झाले असून त्यांना मंगळवारी घरी सोडण्यात आले़ लोकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरीच सुरक्षित राहावे, असे आवाहन पालिकेने केले आहे़ वे़़घाटकोपर येथील झोपडपट्टीतील महिला कोरोना निगेटिव्ह झाली आहे, तिच्या ९ निकटवर्तीयांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचे रोपोर्ट निगेटिव्ह आला़

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसराजेश टोपेमुंबई