Join us

Corona virus : माझा वाघ भाऊ हो... या दुष्ट कोरोनाने टिपला, पंकजा मुंडेंना दु:ख अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 22:40 IST

Corona virus : पकंजा मुंडे यांचे बॉडीगार्ड असलेल्या गोविंद यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गोविंद यांचा मृत्यू अतिशय धक्कादायक बाब असल्याच पंकजा यांनी ट्विटरवरुन म्हटलंय.

ठळक मुद्देपकंजा मुंडे यांचे बॉडीगार्ड असलेल्या गोविंद यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गोविंद यांचा मृत्यू अतिशय धक्कादायक बाब असल्याच पंकजा यांनी ट्विटरवरुन म्हटलंय.

मुंबई - राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असून राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. नुकतेच, राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवेवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. केवळ, अत्यावश्य सुविधांसाठीच ही वाहतूक सेवा वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असून दुसरीकडे रुग्णालयात बेड, ऑक्सिजन आणि इंजेक्शनची कमतरता जाणवत आहे. कोरोनानं गंभीर स्वरुप धारण केलं आहे. भाजपा नेत्या आणि माजीमंत्री पंकजा मुंडेंनी भावनिक आणि दु:खद पोस्ट ट्विटरवरुन शेअर केली आहे. 

पकंजा मुंडे यांचे बॉडीगार्ड असलेल्या गोविंद यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गोविंद यांचा मृत्यू अतिशय धक्कादायक बाब असल्याच पंकजा यांनी ट्विटरवरुन म्हटलंय. पंकजा यांनी ट्विटवरुन गोविंद यांच्यासमवेतच्या आठवणींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, गोविंद, एक जागा कायमची रिकामा झाली, असे भावनिक उद्गार या व्हिडिओत काढले आहेत. या व्हिडिओमध्ये पंकजा मुंडेंसमेवत गोविंद हे पाठीराखा बनून प्रत्येक कार्यक्रमास्थळी हजर असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे राखी पौर्णिमेला पंकजा मुंडे, गोविंद यांच्याकडून राखीही बांधून घेत असत. त्यामुळे, गोविंद यांच्या मृत्युने पंकजा यांना मोठे दु:ख झाले आहे.  रामायण बघतेय लक्ष्मण मूर्छित झाल्यावर स्वतः श्रीराम ही भावूक झाले, युद्ध सोडून दुःखात बुडाले. मी तर सामान्य माणूस ! कार्यकर्ते/स्टाफ माझ्यासाठी तेच स्थान ठेवतात. ते माझा परिवार आहेत. माझा अंगरक्षक गोविंद माझा भाऊ कोरोनाने गंभीर आहे, अस्वस्थता सांगण्यासाठी शब्द नाहीत, कृपया प्रार्थना करा, असे ट्विट पंकजा यांनी केले होते. पंकजा यांनी रात्री हे ट्विट केले. मात्र, उपचारादरम्यान गोविंद यांचा मृत्यू झाला. त्यानंतर, माझा वाघ भाऊ हो... माझा बॉडीगार्ड गोविंद या दुष्ट कोरोनाने टिपला... असे भावनिक आणि दु:खी ट्विट पंकजा यांनी केलं आहे.  दरम्यान, राज्यातील कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर असून रुग्णांच्या मृत्युचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक लॉकडाऊन लागू केला असून जिल्ह्याबाहेर प्रवासाबाबतही नियमावली जाहीर केली आहे.  

टॅग्स :पंकजा मुंडेकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्याबीडमुंबई