Corona Virus: Mumbaikars; Go shopping, be careful | Corona Virus : मुंबईकरांनो; खरेदीसाठी जाताय, काळजी घ्या

Corona Virus : मुंबईकरांनो; खरेदीसाठी जाताय, काळजी घ्या

मुंबई : कोरोनावर संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत आता जीवनशैलीमध्‍ये काही बदल करणे आवश्‍यक झाले असून, मास्‍कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर याच्‍यापलीकडे जाऊन आता वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्‍यात नवीन बदलांचा अवलंब करणे आवश्‍यक झाले आहे.

अशा बदलांचा स्‍वीकार करुन, त्‍या माध्‍यमातून कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी आता जीवनशैलीचा भाग म्‍हणून अंगीकारणे अतिशय गरजेचे आहे. जोवर कोविड विषाणूवर प्रभावी लस सापडत नाही, तोपर्यंत नागरिकांनी या सर्व बाबींचे पालन करुन या साथरोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्‍यासाठी सहकार्य करणे आवश्‍यक आहे, असे म्हणत मुंबईकरांनो; खरेदीसाठी जाताय, काळजी घ्या, असेही आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.


बाजारात जाताय; हे करा
१. बाजारपेठेतखरेदीला जाताना घरातील एकाच व्यक्तीने जाणे, तसेच कमी गर्दीच्या वेळी जाणे.
२. दुकानांबाहेर तसेच आतमध्‍येही इतरांपासून सुरक्षित अंतर राखूनच वावर होईल, याची काळजी घ्‍यावी.
३. गर्दी असल्‍यास तिथे प्रवेश करु नये. लिफ्टऐवजी शक्‍यतो जिन्‍यांचा वापर करावा. कठड्यांना स्‍पर्श करु नये.
४. खरेदीला गेल्यानंतर तेथे प्रदर्शनार्थ ठेवलेल्या वस्तूंना स्पर्श करणे टाळावे.
५. खरेदीसाठी प्राधान्याने ऑनलाइन पद्धतींचा वापर करणे.
६. खरेदी करुन आणलेल्‍या वस्‍तू काही काळ घराबाहेर / मोकळ्या जागेत / जिथे कोणाचाही स्‍पर्श होणार नाही, अशा ठिकाणी ठेवाव्‍यात.
७. दुकानदार/व्‍यावसायिक यांनी मास्‍क न लावलेल्‍या ग्रा‍हकांना प्रवेश देऊ नये.
८. दुकाने/मंडया/संकूल येथे सुरक्षित अंतराच्‍या खुणा करुन मर्यादीत ग्राहकांनाच एकापाठोपाठ प्रवेश द्यावा.
९. दुकानात प्रवेश करणाऱया प्रत्‍येकासाठी शारीरिक तपमान, सॅनिटायझर यांची व्‍यवस्‍था करावी.
१०. दुकाने/मंडया/संकूल येथे मर्यादीत संख्‍येनेच नोकर/मदतनीस यांची नियुक्‍ती करावी.

प्रवास करताना...
१. सहप्रवाशांशी विनाकारण बोलू नये.
२. मास्‍कसमवेत फेसशिल्‍डचाही उपयोग केल्‍यास उत्‍तम.
३. सार्वजनिक वाहनात एका आसनावर एकाच व्‍यक्‍तीने आसनस्‍थ व्‍हावे.
४. दाटीवाटीने प्रवास करु नये. असा प्रवास टाळणे उत्‍तम.
५. वाहनांमध्‍ये दरवाजा, कठडा यांना शक्‍यतो स्‍पर्श करु नये.
६. स्‍पर्श करावा लागणार असल्‍यास त्‍या आधी व वाहनातून उतरल्‍यानंतरही सॅनिटायझर हातांना लावावे.
७. शक्‍यतो खासगी दुचाकी/चारचाकी वाहनाचा उपयोग प्रवासाच्‍या गरजेनुसार करावा.
८. खासगी वाहनांमध्‍ये विनाकारण सहप्रवासी नेऊ नयेत.

हे करा
१. एकदाच वापरात येणारे मास्‍क (सिंगल यूज मास्‍क) वापरुन झाल्‍यानंतर ते टाकून देण्‍यापूर्वी, त्यावर निर्जंतुकीकरण द्राव्य (सॅनिटायझर) शिंपडून, त्‍यांचे तुकडे करुन नंतर टाकावेत. जेणेकरुन त्‍यांचा पुन्‍हा वापर करण्‍यासाठी गैरउपयोग केला जाणार नाही.
२. कुटुंबातील सदस्‍यांनी शक्‍यतो वेगवेगळ्या स्‍वरुपाचे/ मास्‍क वापरावे किंवा स्‍वत:च्‍या मास्‍कला वेगळी खूण करावी. जेणेकरुन प्रत्‍येकाचा मास्‍क ओळखला जाईल. एकमेकांचे मास्‍क वापरु नये.
३. सोसायटीत दरवाज्‍याचा कडीकोयंडा, कठडे (हॅण्‍ड रेलिंग), लिफ्ट, बाक, वाहनतळ अशा विविध ठिकाणी कुठेही हात लावणे शक्‍यतो टाळावे.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Virus: Mumbaikars; Go shopping, be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.