Join us

corona virus : संधीसाधूंवर धाड, डुप्लीकेट सॅनिटायझर्सचा कोट्यवधी रुपयांचा साठा जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 22:00 IST

अन्न व औषध प्रशासनाने अनेक नामांकित कंपन्यांच्या लेबल्स असलेल्या बाटल्यादेखील येथून ताब्यात घेतल्या आहेत

मुंबई - नहूरच्या नाहुर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून कोट्यावधीचा सॅनिटायजर्स साठा जप्त केला आहे. सिद्धिविनायक डायग्रॅम या कंपनीच्या गोदामामध्ये विनापरवाना सॅनिटायझर्स बनविण्याचे काम सुरू होते.  हा माल ओमान आणि इतर देशांमध्ये एक्सपोर्ट करण्यात येणार होता. परंतु, याआधीच अन्न व औषध प्रशासनाने या कंपनीवर धाड टाकली. 

अन्न व औषध प्रशासनाने अनेक नामांकित कंपन्यांच्या लेबल्स असलेल्या बाटल्यादेखील येथून ताब्यात घेतल्या आहेत. सॅनेटायझर्स परीक्षण करण्याची एक लॅब , सॅनिटायझर्स साठविण्यासाठीचे मोठे पिंप, जेल बनवायच्या मशिन्स , अल्कोहोल आणि इतर केमिकल्सचा मोठा साठा या ठिकाणी प्रशासनाला आढळून आला. यावेळी घटनास्थळाचा आढावा घेण्यात आला आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईगुन्हेगारी