Join us

Corona Vaccine: कोरोना लसीमुळे मृत्यू झाल्याचा काेर्टात दावा, एक हजार कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 07:57 IST

Corona Vaccine: कोरोना महासाथीवर परिणामकारक ठरलेली कोविशिल्ड लस टोचल्याने आपल्या मुलीचा मृत्यू झाला असा आरोप करणाऱ्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली असून, याप्रकरणी प्रख्यात उद्योजक बिल गेट्स आणि लसनिर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांना नोटीस बजावली आहे.

मुंबई : कोरोना महासाथीवर परिणामकारक ठरलेली कोविशिल्ड लस टोचल्याने आपल्या मुलीचा मृत्यू झाला असा आरोप करणाऱ्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली असून, याप्रकरणी प्रख्यात उद्योजक बिल गेट्स आणि लसनिर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांना नोटीस बजावली आहे. राज्य सरकारलाही नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी नुकसानभरपाई म्हणून सीरम इन्स्टिट्यूटने एक हजार कोटींची रक्कम द्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. 

नाशिकमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या डॉ. स्नेहल लुनावत यांनी गेल्या वर्षी कोविशिल्ड लस घेतली. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली. अखेर त्यांचा मृत्यू झाला. लेकीच्या मृत्यूप्रकरणी वडील दिलीप लुनावत यांनी न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने लुनावत यांच्या याचिकेची दखल घेतली असून, अदर पूनावाला यांच्यासह बिल गेट्सना प्रतिवादी ठरवले. न्या. गंगापूरवाला आणि माधव जामदार यांच्या खंडपीठाने ही नोटीस बजावली आहे.

टॅग्स :कोरोनाची लसमुंबई हायकोर्ट