Corona Vaccince: कोविन संकेतस्थळावर नोंदणीनंतर त्वरित घ्या लस; पालिका, खासगी रुग्णालयातही सुविधा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 02:49 AM2021-03-21T02:49:38+5:302021-03-21T02:49:52+5:30

शासनाच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रात नि:शुल्क तर खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात अडीचशे रुपये दराने लस उपलब्ध आहे.

Corona Vaccince: Take the vaccine immediately after registration on the Covin website; Municipal, private hospital facilities | Corona Vaccince: कोविन संकेतस्थळावर नोंदणीनंतर त्वरित घ्या लस; पालिका, खासगी रुग्णालयातही सुविधा 

Corona Vaccince: कोविन संकेतस्थळावर नोंदणीनंतर त्वरित घ्या लस; पालिका, खासगी रुग्णालयातही सुविधा 

Next

मुंबई : कोरोनाचे संकट वाढत असल्याने ४५ दिवसांमध्ये नागरिकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. त्यानुसार मुंबईतील ५९ खासगी रुग्णालयांमध्येही अडीचशे रुपयांमध्ये सशुल्क लसीकरणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच कोविन ॲपवर यशस्वी नोंदणी केलेल्या नागरिकांनी लसीकरणाच्या दिनांकाची वाट न पाहता नजीकच्या रुग्णालयांमध्ये थेट जाऊन लस घ्यावी. नोंदणी केली नसेल तरी नजीकच्या रुग्णालयात जाऊन नोंदणी करावी व तेथे लस घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. 

मुंबईत गेल्या महिन्यापासून बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्‍याच्या प्रतिबंधासाठी वेगवेगळ्या उपाययोजना महापालिकेने सुरू केल्या आहेत. १६ जानेवारीपासून लसीकरणही सुरू करण्यात आले आहे. सध्या ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेल्यांना लस देण्यात येत आहे. शासनाच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रात नि:शुल्क तर खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात अडीचशे रुपये दराने लस उपलब्ध आहे.

खासगी रुग्णालयांच्या लसीकरण केंद्रांची यादी 
जसलोक, एच. एन. रिलायन्स, सैफी, ब्रीचकँडी, भाटिया, व्होकहार्ट, एल.एच. हिरानंदानी, बॉम्बे, ग्लोबल, हिंदुजा, लीलावती, नानावटी, कोकिळाबेन, एस. एल. रहेजा, फोर्टिस (मुलुंड), होली फॅमिली, इनलॅक्स, बी. डी. पेटीट पारसी, एच. जे. दोशी वैद्यकीय महाविद्यालय, शीव (सायन), के. जे. सोमैय्या वैद्यकीय महाविद्यालय, शीव, (सायन), एस. आर. सी. सी. चिल्ड्रन हॉस्पिटल (महालक्ष्मी), लाईफ लाईन (गोरेगाव), पारख (घाटकोपर), लायन ताराचंद बाप्पा रुग्णालय, शीव (सायन), मिल्लत डायलेसिस सेंटर (अंधेरी), शुश्रुत  (चेंबूर), सुराणा सेठिया (चेंबूर), शांतिनिकेतन (घाटकोपर), बालाजी (भायखळा), बालाजी (मालाड), होली स्पिरीट, सर्वोदय, करुणा, एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, प्रिन्स अलीखान, मित्तल, मसिना, गुरुनानक, संजीवनी, थुंगा, ऑस्कर, कोहिनूर, एस. आर. व्ही., गोदरेज, सनराईज, क्रिटिकेअर, सूर्या, सपना हेल्थ केअर, रिद्धिविनायक (मालाड), सुराणा (मालाड), शिवम् (कांदिवली), डॉ. मिनाज (भांडुप), भाटिया (भांडुप), प्लॅटिनम (भांडुप), एन. वाडिया (परळ), राणे (चेंबूर), मल्लिका (जोगेश्वरी), एच. सी. जी. अपेक्स कॅन्सर सेंटर, लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी

Web Title: Corona Vaccince: Take the vaccine immediately after registration on the Covin website; Municipal, private hospital facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.