Join us  

Corona vaccination: लसीकरण वाढवण्यासाठी केरळ पॅटर्न वापरा, माजी आरोग्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 9:10 PM

Corona vaccination News : लसीकरणासाठी लस कमी पडत असतांना केरळने अतिशय हुशारीने प्राप्त झालेल्या 73 लाख 38 हजार 806 लसींच्या डोस मधून शून्य वेस्टज करत त्यामधून 74 लाख 26 हजार 164 व्यक्तींचे लसीकरण केले आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - राज्यात दि,1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू केले आहे.तर 45 ते 59 आणि 60 वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. एकीकडे राज्याला सध्या लसींचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध होत असतांना, दुसरीकडे लसींचे वेस्टज देखिल होते.

लसीकरणासाठी लस कमी पडत असतांना केरळने अतिशय हुशारीने प्राप्त झालेल्या 73,38806 लसींच्या डोस मधून शून्य वेस्टज करत त्यामधून 74,26164 व्यक्तींचे लसीकरण केले आहे.लसीचे होणारे वेस्टज वाचवण्यासाठी केरळ पॅटर्न लागू करावा अशी विनंती राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

खाजगी व्यवसाय करणारे अनेक डॉक्टर्स विशेषतः आय सर्जन या पद्धतीचा अवलंब करतांना इंजेक्शन बल्ब मधील थेंब व थेंब वापरतात. तीच पद्धत आपण अवलंबली तर केरळप्रमाणे आपणही लस देऊन त्याच लसीच्या साठ्यातून जास्त नागरिकांना लस देऊ शकू असे मत त्यांनी व्यक्त केले.

केरळ राज्याच्या म्हणण्यानुसार वाहतूकीच्या प्रक्रियेत,कोल्ड चेन मेंटेन न झाल्यास किंवा सिरीन मध्ये किंवा वॅक्सिंन घेतांना या तीन वेळेला लसींचे वेस्टज होऊ शकते. कुशल नर्सेसने लस देतांना जर योग्य रित्या लसीकरणाची प्रक्रिया अवलंबली तर 5 मिलीच्या एका व्हायल मधून 10 डोस ऐवजी 11 किंवा दुसरा जास्त डोस शकतो.त्यासाठी अँटीडोस्पोसेबल सिरीज वापरल्यास फायदा होईल. त्यामुळे अश्याप्रकरचा प्रोटोकॉल वापरण्यास हरकत नाही असे मत डॉ.दीपक सावंत यांनी व्यक्त केले.

 ज्यावेळी आपण लसीकरणाच्या लस असलेल्या कुपी मधून इंजेक्शनच्या सिरीज मध्ये काही प्रमाणात सुई आणि इंजेक्शनच्या सिरीज मध्ये काही अंशी लस शिल्लक राहाते.ते वापरल्यास 0.5 मिलीचा डोस तितकाच वापरल्यास आणखी एका व्यक्तीला आपण डोस मागे लस देऊ शकू. मात्र त्यासाठी प्रोटोकॉल तयार करून बारकाईने  काटेकोरपणे लस सिरीजमध्ये काढतांना काळजी घेऊन प्रथम हवेचा बुडबुडा दूर करून डोस 0.5 मिली वापरून आपण पूर्ण बल्ब मधील लसीचे वेस्टज न करता अधिक रुग्णांना लस देऊ शकतो. यासाठी लसीकरण कर्मचारी व नर्सेस यांना सूचना देणे आवश्यक आहे असे डॉ.दीपक सावंत यांनी सांगितले.

तसाच प्रकारचा प्रोटोकॉल ऑक्सिजन वापरासाठी करणे आवश्यक आहे.लिकेजमुळे फुकट जाणारा ऑक्सिजन वाचवता येईल.तसेच हाय फ्लो नोझल ऑक्सिजनसाठी एस.ओ. पी.तयार करणे आवश्यक आहे.तसेच वॉलमाउंटेड ऑक्सिजन पाईपलाईनची पाहणी करणे आवश्यक आहे. व्हाल्व कपलिंगची तपासणी करणे,ऑक्सिजन ज्या पाईपलाईन मधून जंबो कोविड किंवा हॉस्पिटलमध्ये जातो त्याची देखभाल करणे आवश्यक आहे. राज्य शासनाने विशेषतः रिफिलिंग स्टेशनमधून रिफिलिंग करतांना फुकट जाणारा ऑक्सिजन वाचवल्यास खूप लोकांचा जीव वाचवू शकतो असे डॉ.दीपक सावंत म्हणाले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोनाची लसदीपक सावंतउद्धव ठाकरेकेरळ