‘कलामंच’चा कोरोना विशेषांक प्रकाशित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:06 IST2021-05-31T04:06:17+5:302021-05-31T04:06:17+5:30

मुंबई : कोरोनाच्या भीषण काळावर मात करून संपादिका हेमांगी अरविंद नेरकर यांनी कलामंचचा अर्धवार्षिक कोरोना विशेषांक - २०२१ ...

Corona special issue of 'Kalamanch' published | ‘कलामंच’चा कोरोना विशेषांक प्रकाशित

‘कलामंच’चा कोरोना विशेषांक प्रकाशित

मुंबई : कोरोनाच्या भीषण काळावर मात करून संपादिका हेमांगी अरविंद नेरकर यांनी कलामंचचा अर्धवार्षिक कोरोना विशेषांक - २०२१ प्रकाशित केला. या अंकात मान्यवर साहित्यिक अनुराधा नेरुरकर, प्रा. सुहासिनी कीर्तिकर, ज्योती कपिले, प्रा. प्रतिभा सराफ, सुवर्णा जाधव, सूर्यकांत आंगणे, किरण आचार्य, अश्विनी स्वर्ण यांचे लेख असून, रेखा नार्वेकर, लता गुठे, गौरी कुलकर्णी, शिवाजी गावडे, संगीता अरबुने, फरझाना इकबाल, मधुरा चव्हाण, चित्रा क्षीरसागर, पूजा काळे, अलका देशमुख, कमलाकर राऊत, राजेंद्र वैद्द यांच्या कोरोनावरील आशयघन कविता आहेत. तसेच गो... कोरोना ही उषा परब यांची एकांकिका आहे. मुखपृष्ठ आणि व्यंगचित्रे यशराज नेरकर यांनी साकारली असून, मुखपृष्ठ काव्य ॲड. मिनल नेरकर यांचे आहे.

Web Title: Corona special issue of 'Kalamanch' published