Join us

मुंबईत बरे झालेल्या कोरोना रुग्णांचा दर ८० टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 04:43 IST

तर आतापर्यंत १ लाख ३ हजार ४६८ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. १७ हजार ८२५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण दुपटीचा दर ८५ दिवस झाला आहे.

मुंबई : मुंबईत बरे झालेल्या कोरोना रुग्णांचा दर ८० टक्क्यांवर गेला आहे. तर आतापर्यंत १ लाख ३ हजार ४६८ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. १७ हजार ८२५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण दुपटीचा दर ८५ दिवस झाला आहे.९ ते १५ आॅगस्ट दरम्यान मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत मुंबईत कोविडच्या ६ लाख ५१ हजार ५९३ चाचण्या झाल्या आहेत. सध्या शहर-उपनगरात झोपडपट्ट्या चाळींमध्ये ५७० सक्रिय कंटेनमेंट झोन्स आहेत, तर ५ हजार ६३१ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मुंबईत रविवारी १ हजार १० रुग्णांचे निदान झाले असून ४७ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख २८ हजार ७२६ झाली असून मृतांची संख्या ७ हजार १३३ झाली आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३१ लाख ६२ हजार ७४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८.८४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस