Join us  

राज्यभरात २४ तासांत ८ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 5:41 PM

मृत्यूचा आकड़ा २०२ वर, मुंबई, रत्नागिरी पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश 

मुंबई : राज्यभरात कोरोनामुळे दिवसेंदिवस पोलिसांभोवती कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत मुंबई पोलीस, रत्नागिरी पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांसह राज्यभरात ८ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पोलिसांच्या मृत्यूचा आकड़ा २०२ वर गेला आहे. 

राज्यभरात १९ हजार ७५६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यात २ हजार १४२ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी १ हजार ६६२ पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण १५ हजार ३८० जणांनी कोरोनावर मात केली. तर ३ हजार ७२४ पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  यात गेल्या २४ तासांत ३७१ कोरोनाबाधि पोलिसांची भर पडली आहे. तर ८ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. यात मुंबई पोलीस, रत्नागिरी पोलीस दलातील दोन अधिकारी आणि ठाणे शहर, नाशिक शहर , जळगाव, उस्मानाबाद, नंदुरबार, सांगली येथील सहा पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे  पोलिसांच्या मृत्यूचा आकड़ा २०२ वर गेला आहे. १५ दिवसांत तब्बल ४६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जून, जुलै ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्ये मृत्यूचा आकड़ा वाढत आहे. तसेच कोरोनाबाधित पोलिसांचा आकडाही दिवसाला ३०० ते ५०० च्या घरात जात आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये भितीचे वातावरण वाढत आहे. 

टॅग्स :पोलिसकोरोना वायरस बातम्यामुंबईमहाराष्ट्र