Join us

कोरोनाने ११० रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबियांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 18:39 IST

रेल्वे कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग होत आहे. या कर्मचाऱ्यांकडून कुटूंबियांना देखील बाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे.

मुंबई : रेल्वे कर्मचारी अत्यावश्यक लोकल सेवा, विशेष ट्रेन सेवा सुरळीत राहण्यासाठी काम करत आहेत. मात्र ही कामे करता-करता रेल्वे कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग होत आहे. या कर्मचाऱ्यांकडून कुटूंबियांना देखील बाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जुलैपर्यंत पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात कोरोनाने ११० रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबियांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संक्रमित ११० रुग्णांपैकी मध्य रेल्वे मार्गवरील ८० रेल्वे कर्मचारी आणि त्यांचा कुटुंबीयांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वे मार्गवरील २७ आणि इतर ३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

जगजीवन राम रुग्णालयात कोरोनाची लक्षणे असलेल्या आणि कोरोनाबाधित अशा १ हजार ५६१ रुग्णांवर उपचार करण्यात आला. यापैकी १ हजार २६९ जणांना उपचार देऊन घरी सोडले असून १४८ जणांवर उपचार सुरू आहेत. तर, ६ जण कोरोना संशयित आहेत. कोरोना संक्रमित ११० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, २८ रुग्णांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांचा मृत्यू अन्य कारणाने झाला, अशी पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे. 

मध्य रेल्वेच्या ७२०, पश्चिम रेल्वेच्या ३७९ कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली होती. तर, ७९ रुग्ण संख्या इतर रेल्वे विभाग, एमआरव्हीसी, मुंबई महानगर क्षेत्रातील नागरिकांची आहे. त्याच्यावर पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात उपचार करण्यात आले. सध्या पश्चिम रेल्वेच्या ३१, मध्य रेल्वेच्या ११४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर, अन्य ३ नागरिकांवर जगजीवन राम रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यारेल्वेमुंबई