'त्या' शंभर प्रवाशांपैकी एक कोरोना बाधित; जिनोम सिक्वेन्सिंगच्या रिपोर्टची प्रतिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 12:17 AM2021-12-01T00:17:42+5:302021-12-01T00:18:38+5:30

Coronavirus : सदर बाधित व्यक्तीस कोणतीही लक्षणे नाहीत. तसेच त्याची प्रकृती चांगली असल्याचे पालिकेने सांगितले. 

Corona disrupted one of those 'hundred' passengers; Awaiting Genome Sequencing Report in mumbai | 'त्या' शंभर प्रवाशांपैकी एक कोरोना बाधित; जिनोम सिक्वेन्सिंगच्या रिपोर्टची प्रतिक्षा

'त्या' शंभर प्रवाशांपैकी एक कोरोना बाधित; जिनोम सिक्वेन्सिंगच्या रिपोर्टची प्रतिक्षा

Next

मुंबई :  युरोप, दक्षिण आफ्रिका या देशात कोविडचा नवीन प्रकार ओमायक्रॉनचा प्रभाव वाढला आहे. या देशातून मुंबईत आलेल्या शंभर प्रवाशांच्या सुरू असलेल्या चाचणीत एक प्रवासी कोरोना बाधित आहे. सदर बाधित व्यक्तीस कोणतीही लक्षणे नाहीत. तसेच त्याची प्रकृती चांगली असल्याचे पालिकेने सांगितले. 

परदेशातून १५ दिवसांपूर्वी मुंबईत आलेल्या ४६६ प्रवाशांपैकी १०० प्रवासी मुंबईतील रहिवाशी आहेत. या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची कोविड चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीत एक प्रवासी कोविड बाधित आढळला आहे. सदर बाधित व्यक्ती ४० वर्षीय असून त्याच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.

हा प्रवासी पश्चिम उपनगरातील रहिवासी आहे. दक्षिण आफ्रिकेतील रहिवासी असलेला हा व्यक्ती १५ दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. या व्यक्तीला कोणत्या प्रकारच्या विषाणूची लागण झाली आहे? हे जिनोम सिक्वेन्सिंगनंतर स्पष्ट होणार आहे.

Web Title: Corona disrupted one of those 'hundred' passengers; Awaiting Genome Sequencing Report in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app