Join us
Daily Top 2Weekly Top 5

आझाद मैदानात जागोजागी मराठ्यांच्या कॉर्नर बैठका! मराठ्यांच्या कॉर्नर मिटिंगने आझाद मैदान फुललेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 15:10 IST

जरांगे पाटील यांना मुंबईत प्रवेश दिला नसला तरी लाखोच्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल झाला आहे.

मुंबई (श्रीकांत जाधव) : राज्यभरातून मुंबईत आलेल्या बांधवांकडून मैदानात जागोजागी कॉर्नर बैठका घेण्यात येत होत्या. मराठ्यांच्या पुढाऱ्यांकडून या कॉर्नर बैठकांना आंदोलनाची दिशा दिली जात होती. त्यामुळे संपूर्ण आझाद मैदान मराठा समाजाच्या बैठकांनी फुललेले होते.

जरांगे पाटील यांना मुंबईत प्रवेश दिला नसला तरी लाखोच्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल झाला आहे.  आझाद मैदानात सुद्धा दुपारनंतर गर्दी वाढली होतो. जिल्हा जिल्ह्यातून आलेले मराठा बांधव आझाद मैदानात ठाण मांडून बसले होते. प्रत्येकाने आझाद मैदानाचा एकेक कोपरा धरून कॉर्नर बैठका  सुरू केल्या होत्या. त्याला वरिष्ठ बांधव मार्गदर्शन करत होते. त्यामुळे संपूर्ण आझाद मैदानात जागोजागी कॉर्नर मिटिंग दिसून येत होत्या.

टॅग्स :मराठा आरक्षणमनोज जरांगे-पाटील