Join us  

फेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 3:00 AM

भारत रावल असे अटक आरोपीचे नाव आहे. महेश्वरी यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट जातीयवादी असल्याचे रावलचे म्हणणे होते. त्यावरून या दोघांत गेल्या महिनाभरापासून वाद सुरू होता.

मुंबई : देवजी महेश्वरी या वकिलांनी टाकलेली फेसबुक पोस्ट जातीयवादी असल्याचा आरोप करून, याच पोस्टवरून झालेल्या वादंगामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गुजरातच्या कच्छमध्ये हा प्रकार घडल्यानंतर शनिवारी रात्री गुजरातच्या रापर पोलिसांनी या प्रकरणी तपासाअंती मालाडच्या स्टेशनरी शॉपमधून एकाला अटक केली.

भारत रावल असे अटक आरोपीचे नाव आहे. महेश्वरी यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट जातीयवादी असल्याचे रावलचे म्हणणे होते. त्यावरून या दोघांत गेल्या महिनाभरापासून वाद सुरू होता. अखेर रावल बुधवारी मालाडवरून रापरला महेश्वरीला संपविण्याच्या उद्देशाने गेला. शुक्रवारी सीसीटीव्हीमध्ये लाल रंगाचा टी-शर्ट घालून महेश्वरी यांच्या इमारतीत संशयास्पदपणे शिरताना आणि त्यानंतर धावत इमारतीतून बाहेर पडताना त्याची ओळख पटली. त्यानुसार, तपासाअंती त्याला मालाडमधून अटक करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसफेसबुकमुंबई