For the control of swine flu now people will be given awareness | स्वाइन फ्लूच्या नियंत्रणासाठी आता जनजागृतीवर देणार भर
स्वाइन फ्लूच्या नियंत्रणासाठी आता जनजागृतीवर देणार भर

मुंबई : वातावरणातील विचित्र बदलांमुळे स्वाइन फ्लूचा जोर वाढतो आहे. यावर प्रतिबंध व नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाने सर्वंकष कृती योजना अंमलात आणली आहे. त्यासाठी सर्वेक्षण, निदान, उपचार, लसीकरण आणि जनजागृती या पंचसूत्रीचा वापर केला जात आहे. यानुसार, हा आजार कसा पसरतो, त्याची लक्षणे, तो होऊ नये म्हणून घ्यायची काळजी, आजार पसरू नये म्हणून घ्यायची काळजी, या आजारावरील उपचाराबाबत माहिती सामान्यांना द्यावी असे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत.

स्वाइन फ्लू संदर्भात प्रभावीपणे जनजागृती होण्याकरिता विविध माध्यमांचा वापर करतानाच विविध समुदायांच्या गटसभा आणि कार्यशाळा घेणे, शालेय स्तरावर जनजागृती मोहीम घेणे, यात्रा, उत्सव, आठवडे बाजाराच्या ठिकाणी आरोग्य शिक्षण देण्याकडे आरोग्य विभाग भर देत आहे. ग्रामीण भागात असणाऱ्या ग्राम आरोग्य स्वच्छता व पोषण समिती तसेच शहरी भागात असलेल्या महिला आरोग्य समित्यांच्या सदस्यांची बैठक घेऊन त्यांचे यासंदर्भात प्रबोधन सुरू आहे.

सध्या १८२ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. |ऑसेलटॅमिवीर या गोळ्या देण्यात आलेल्या संशयित फ्लू रुग्णांची संख्या १६ हजार ५४१ इतकी आहे.
दरम्यान, राज्यभरातील स्वाइन फ्लूच्या १ हजार ४०८ रुग्णांपैकी १ हजार ९५ रुग्णांची तब्येत सुधारल्याने त्यांना रुग्णालयांतून घरी सोडले आहे. तर जानेवारी महिन्यापासून ९ लाख ३९ हजार ९०६ रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यात १ जानेवारी ते २६ एप्रिल या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूमुळे १३१ जणांचा मृत्यू झाला.

२०१८ साली राज्यात स्वाइन फ्लूने जवळपास अडीच हजार जणांना संसर्ग होऊन ४६१ जणांचा मृत्यू झाला होता. पण, मुंबईत २३ रुग्णांना बाधा झाली असून एकाही मृत्यूची नोंद नाही. परंतु, फेब्रुवारी महिना उजाडताच शहरात स्वाइन फ्लूचा संसर्ग पसरण्यास सुरुवात झाली, तर मार्चमध्ये मुंबईत दोन महिलांचे मृत्यू ओढावले आहेत.
उपचार लवकर मिळणे आवश्यक

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, स्वाइन फ्लू आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. दुर्दैवाने अनेक रुग्णांमध्ये स्वाइन फ्लूचे निदान उशिरा होते. त्यामुळे उपचारही उशिरा सुरू होतात. स्वाइन फ्लू आणि फ्लू यातील अंतर लक्षात न घेता रुग्ण घरच्या घरी आजार बरा करण्याचा प्रयत्न करतात. त्यातून निर्माण होणाºया समस्या त्या रुग्णाच्या जीवावर बेतू शकतात.

वर्ष       मृत्यू     रुग्ण
२०१८ - ४६१ - २५९३
२०१७ -७७८ -६१४४
२०१६- २६ -८२
२०१५-  ९०५ - ८५८३
२०१४-  ४३ - ११५

Web Title: For the control of swine flu now people will be given awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.