मुंबई : प्रभादेवीतील गजबजलेल्या सेंच्युरी बाजार काॅमप्लेक्समध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास माल उतरवत असताना अचानक कंटेनरखाली उतरल्याने गुरुवारी खळबळ उडाली. नागरिकांची पळापळ सुरू झाली. यावेळी बसथांब्यावर कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.
अवघ्या काही मिनिटांतच तो दुभाजक तोडून सेंच्युरी बाजारच्या बसथांब्याला धडकला. यामुळे वरळीहून दादर आणि दादरकडून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. दादर पोलिसांनी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कंटेनर मालकाला ताब्यात घेतले असून, तपास सुरू आहे.