चेंबूरमध्ये नवी मुंबईच्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार
By मनीषा म्हात्रे | Updated: April 9, 2025 23:38 IST2025-04-09T23:35:58+5:302025-04-09T23:38:23+5:30
त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चेंबूरमध्ये नवी मुंबईच्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: चेंबूरमध्ये बुधवारी रात्री डायमंड गार्डन परिसरात नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाच्या वाहनावर दुचाकीवरून आलेल्या दुकलीने गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांच्यावर झेन रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत डायमंड गार्डन सिग्नल परिसरात रात्री. ९.५० वाजता ही घटना घडली. बेलापूरच्या पारसिक हिल परिसरात राहणारे व्यावसायिक सद्रुद्दीन खान (५०) हे सायन पनवेल हायवेने पनवेलला जात असताना दोघांनी दुचाकीवर येऊन गोळीबार केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. घटनेची वर्दी लागताच चेंबूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोळी लागून जखमी झालेल्या खान यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास करत आहे.