Join us  

पर्यावरणाचे संवर्धन ही जीवनशैली बनावी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2021 1:20 AM

पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागामार्फत ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात येत आहे.

मुंबई : पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन हा केवळ सरकारी उपक्रम न राहता, ती प्रत्येकाची जीवनशैली बनली पाहिजे. ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविताना यामध्ये प्रत्येकाने सहभाग द्यावा व त्यातून याला लोकचळवळीचे स्वरूप देण्यात यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केले.

पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागामार्फत ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ‘माझी वसुंधरा’ ई-शपथ (ई-प्लेज) उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज या उपक्रमाचा ऑनलाइन कार्यक्रमात आरंभ करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमात सहभागी होत राज्याच्या पर्यावरणाचे संवर्धन करण्यास मी कटिबद्ध राहीन, अशी ई-शपथ घेतली.

टॅग्स :उद्धव ठाकरेपर्यावरण