Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेस्को कोविड सेंटर व नानावटी हॉस्पिटल टेलीमेडीसिनच्या माध्यमातून जोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 17:01 IST

Covid News : रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होईल.

मनोहर कुंभेजकर

मुंबई : नेस्को कोविड सेंटर व नानावटी हॉस्पिटल टेलीमेडीसिनच्या माध्यमातून जोडून व वेळोवेळी प्रत्यक्ष तेथील इंन्टेसिव्हीस्टनी येऊन मार्गदर्शन केल्यास येथील अत्यवस्थ रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होईल. तसेच येथे एक सुसज्ज,सुसज्ज आयसीयू होऊ शकेलं आणि गरीब रुग्णांना खूप मोठा फायदा होऊन रुग्णांचे प्राण वाचतील असे मत राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी व्यक्त केले.इतर कोविड फॅसिलिटी देखिल याप्रमाणे झाल्या पाहिजे.

भविष्यात ट्रेन सुरू झाल्यावर कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता,आणि  नेस्को कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी पश्चिम उपनगरातील येणाऱ्या कोविड रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता  येथे मोबाईल सीटी स्कॅन सुविधा सुरू होणे गरजेचे आहे. कारण सध्या रुग्णांना सीटी स्कॅनसाठी जोगेश्वरी येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रामा सेंटर किंवा नानावटी हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागते.

आपण याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर माहिती दिली असे त्यांनी सांगितले. तसेच सीएसआरच्या माध्यमातून सदर सुविधा होणे गरजेचे असल्याचे आपण राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांना सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबई महानगर पालिकेच्या गोरेगाव (पूर्व) पश्चिम दूर्तगती महामार्गालगत असलेल्या नेस्को कोविड सेंटरमध्ये असलेल्या आयसीयू व अत्यवस्थ रुग्णांना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळावा म्हणून डॉ.दीपक सावंत यांनी नुकतीच एक महत्वाची बैठक नेस्को येथे घेतली होती. या बैठकीला नानावटी हॉस्पिटलच्या इंन्टेसिव्हीस्ट डॉ.अब्दुल अन्सारी,नेस्को कोविड सेंटरच्या डीन डॉ.निलम आंद्राडे,डॉ.अर्चना तसेच इतर आयसीयू व ऑक्सिजन बेड वॉर्डात काम करणाऱ्या डॉक्टरांची बैठक घेतली. आणि सध्या सुरू असलेल्या प्रोटोकॉल ट्रिटमेंट विषयी सविस्तर चर्चा झाली.या चर्चेतून विशेष:ता ऑक्सिजन पुरवठा,ट्रीटमेंट व कोणते इन्वेस्टीगेशन कधी करावे यावर देखिल चर्चा झाल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकोरोना वायरस बातम्यालॉकडाऊन अनलॉकमुंबई