"राज्यातील आगामी पालिका व नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला एक नंबर बनवणार"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 21:17 IST2021-11-17T21:17:19+5:302021-11-17T21:17:28+5:30
नवनियुक्त कोषाध्यक्ष डॉ अमरजीत सिंग मनहास यांनी आज दिल्लीतील कांग्रेस मुख्यालयात अखिल भारतीय कांग्रेस कमेटीचे संगठन महासचिव के.सी. वेणूगोपाल यांना दिली.

"राज्यातील आगामी पालिका व नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला एक नंबर बनवणार"
मनोहर कुंभेजकर
मुंबई-देशात काँग्रेस पक्ष हा जुना पक्ष असून सर्व जाती धर्माच्या नागरिकांना एकत्र घेऊन जाणारा पक्ष अशी पक्षाची ख्याती आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे महाराष्ट्रात स्वबळावर काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवव्याचे स्वप्न आहे.त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी टीम काँग्रेस म्हणून एकदिलाने काम करून आगामी महापालिका व नगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवण्याची ठाम ग्वाही महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे नवनियुक्त कोषाध्यक्ष डॉ अमरजीत सिंग मनहास यांनी आज दिल्लीतील कांग्रेस मुख्यालयात अखिल भारतीय कांग्रेस कमेटीचे संगठन महासचिव के.सी. वेणूगोपाल यांना दिली.
यावेळी अखिल भारतीय कांग्रेस कमिटीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष पवन बंसल, अखिल भारतीय कांग्रेस कमिटीचे महासचिव तारिक अन्वर यांची सुद्धा त्यांची वेगळी भेंट घेतली. यावेळी मनहास यांनी या मान्यवरांशी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि राज्यात होणाऱ्या आगामी पालिका निवडणूकांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी वारकरी साहित्य परिषद अध्यक्ष विट्ठल पाटील, मुंबई कांग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजी सिंह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.