Join us  

विदर्भातील काँग्रेसजनांनी मांडली ज्येष्ठ नेत्यांसमोर भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2019 6:31 AM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांना मनापासून मदत केली नाही, अशी तक्रार विदर्भातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर ...

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांना मनापासून मदत केली नाही, अशी तक्रार विदर्भातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर केली. तसेच, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना विधानसभेत सोबत घेऊ नका, अशी भूमिकाही मांडली.

लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर चर्चेसाठी सध्या काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण जिल्हावार बैठका घेत आहेत. टिळक भवनात विदर्भातील जिल्ह्यांच्या बैठका झाल्या. राष्ट्रवादीचे विदर्भात बळ आहे तेथे आपल्या उमेदवारांना पिछाडीवर राहावे लागले, असे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नावांनिशी सांगितले. त्यात यवतमाळ, रामटेक, वर्धा या मतदारसंघांचा समावेश होता. अमरावतीची जागा राष्ट्रवादीला सोडली, त्यांनी ती नवनीत राणा यांना दिली. तेथे काँग्रेसने राणांच्या विजयासाठी प्रयत्न केले, पण काँग्रेसला यशाचे श्रेय द्यायलाही ते तयार नाहीत, अशी तक्रार अमरावतीच्या पदाधिकाºयांनी केली. राष्ट्रवादीचे काही नेते भाजप-शिवसेनेसाठी काम करीत होते याकडे काहींनी लक्ष वेधले. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना आपल्याबरोबर आघाडी लोकसभेला करायची नव्हती. म्हणून त्यांनी अव्वाच्या सव्वा मागण्या केल्या. विधानसभेत त्यांची सोबत नको, अशी मागणी आंबेडकरांचा प्रभावपट्टा असलेल्या अकोला, बुलडाणा, वाशिमच्या काँग्रेसजनांनी केली.राष्ट्रवादीची मदत नाही । आंबेडकरांची सोबत नकोतक्रारी आहेत, पण आघाडी होईलराष्ट्रवादीने मनापासून साथ दिली नाही, अशा तक्रारी जिल्ह्याजिल्ह्यातील काँग्रेसजनांकडून केल्या जात आहेत. उमेदवार आणि पदाधिकाºयांची ही भावना स्वाभाविक आहे, पण याचा अर्थ आम्ही विधानसभेला राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, असा होत नाही. आम्ही या तक्रारींबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करू. भविष्यात आघाडीबाबत आम्ही सकारात्मक आहोत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नंतर पत्रकारांना सांगितले.महाजन हे सत्ताधुंद आहेतभाजपचे मंत्री गिरीश महाजन हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा करीत आहेत. सध्या त्यांना सत्तेची धुंदी असल्याने दुसरे काही दिसत नाही, पण मला तसे वाटत नाही. जी मंडळी पक्षाच्या विचाराने बांधलेली आहेत, ज्यांनी आतापर्यंत काम केले आहे ते सोडून जातील असे वाटत नाही. भाजप फोडाफोडीचे राजकारण करीत आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली.

टॅग्स :अशोक चव्हाणकाँग्रेसमुंबई