Congress Prithviraj Chavan News: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची संयुक्त बैठक टिळक भवन येथे संपन्न झाली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यासह काँग्रेसचे अन्य पदाधिकारी, नेते उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा सरकारवर टीका केली.
काँग्रेस सक्षम विरोधी पक्ष
भाजपा सरकार सर्व पातळ्यावर अपयशी ठरले आहे. अमेरिकेबरोबरचा व्यापार करार, एपस्टिन फाईल्समुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी दबावात आहेत. सरकार विरोधातील प्रश्नावर जनमानसात माहिती पोहचवली पाहिजे. शेतकरी प्रश्न, बेरोजगारी व इतर मलभूत प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले पाहिजे. सरकारविरोधात लढले पाहिजे. कोस्टल रोडवरून दररोज अंदाजे ५० हजार लोक प्रवास करतात तर लोकलमधून दररोज ९० लाख लोक प्रवास करतात. लोकलमधून दररोज १० प्रवाशांचे मृत्यू होतात, लोकल प्रवाशांना सुविधा दिल्या पाहिजेत. दररोज ८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. काँग्रेस पक्ष सर्वात मोठा विरोधी पक्ष असून एका सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे घेऊन मला एका वर्ष झाले, या एका वर्षात मी केलेल्या कामाचा अहवाल बैठकीत मांडला. तसेच आगामी वर्ष संघटन बांधणीचे वर्ष म्हणून काम केले जाणार आहे. ग्रामीण भागात मंडल स्तरावर, गावपातळीवर व शहरात वार्ड प्रभाग अध्यक्ष नियुक्त करण्याचे नियोजन आहे. भाजपा सरकारचे अपयश जनतेसमोर मांडण्यासाठी शेतकरी, बेरोजगारी, महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था सारख्या मुलभूत प्रश्नांवर विविध पद्धतीने आंदोलन करुन सरकारला जाब विचारला जाईल, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
Web Summary : Congress leaders criticize the BJP government's failures on multiple fronts. Issues like farmer suicides, unemployment, and lack of local train facilities were highlighted. Congress aims to become a strong opposition, fighting for people's basic needs through protests.
Web Summary : कांग्रेस नेताओं ने भाजपा सरकार की विफलता की आलोचना की। किसान आत्महत्या, बेरोजगारी और स्थानीय ट्रेनों की कमी जैसे मुद्दों को उठाया गया। कांग्रेस विरोध प्रदर्शनों के माध्यम से लोगों की बुनियादी जरूरतों के लिए लड़ते हुए एक मजबूत विपक्ष बनने का लक्ष्य रखती है।