काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात मुंबईतील रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 09:39 IST2024-06-08T09:39:14+5:302024-06-08T09:39:26+5:30

५ जून रोजी त्यांना जास्त त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Congress leader Balasaheb Thorat admitted to hospital in Mumbai | काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात मुंबईतील रुग्णालयात दाखल

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात मुंबईतील रुग्णालयात दाखल

मुंबई : काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांना ताप आणि घशाचा संसर्ग झाल्यामुळे मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

५ जून रोजी त्यांना जास्त त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती सुधारत असून, लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

शुक्रवारी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, माजी मंत्री सुनील केदार, तसेच रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Web Title: Congress leader Balasaheb Thorat admitted to hospital in Mumbai