Join us

Congress: राहुल गांधींच्या हस्ते काँग्रेसच्या वॉर रूमचं उद्घाटन, भाजपाला प्रत्युत्तर देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 17:58 IST

Congress Social Media War Room: सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय विरोधकांवर चिखलफेक करणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांची बदनामी करणे तसेच खोटी, चुकीची माहिती पसरवून समाजाची दिशाभूल करण्याचे काम भारतीय जनता पक्ष सातत्याने करत आहे.

मुंबई - सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय विरोधकांवर चिखलफेक करणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांची बदनामी करणे तसेच खोटी, चुकीची माहिती पसरवून समाजाची दिशाभूल करण्याचे काम भारतीय जनता पक्ष सातत्याने करत आहे. भाजपा सोशल मीडीयाचा दुरुपयोग करत फेक न्यूजही ससरवत असतो. भाजपाचा हा प्रपोगंडा हाणून पडण्यासाठी व भाजपाकडून होत असलेला अपप्रचार खोडून काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने अत्याधुनिक वॉर रुमची स्थापना केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, खा. राहुलजी गांधी यांच्या हस्ते टिळक भवन येथील ‘भारतरत्न राजीव गांधी सोशल मीडिया सेंटर’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आदी उपस्थित होते.

काँग्रेस सोशल मीडिया महाराष्ट्राचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांच्या नेतृत्वात काँग्रेसची ही सोशल मीडिया टीम काम करणार आहे. या सोशल मीडिया केंद्रात स्टुडिओ तयार करण्यात आलेला आहे तसेच अत्याधुनिक सॉफ्टवेरअयुक्त उपकरणे आहेत. या सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्याकरिता अत्यंत कुशल तंत्रज्ञानस्नेही सोशल मीडिया टीम सज्ज करण्यात आलेली आहे. राहुल गांधी व खर्गे यांनी या केंद्राची पाहणी करुन सोशल मीडिया यंत्रणेचे कौतुक केले.

टॅग्स :काँग्रेसराहुल गांधी