Join us

सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 06:12 IST

रमेश चेन्नीथला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकांची रणनीती ठरविण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील शेतकरी, लाडकी बहीण योजना लाभार्थी आणि बेरोजगार युवकांची महायुती सरकारने घोर फसवणूक केली असल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.

शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी जुन्या योजनांचे एकत्रीकरण करून फसवे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. कर्जमाफीवर सरकार गप्प आहे, तर 'लाडकी बहीण' योजनेत जाहीर केलेले २१०० रुपये देण्यासही टाळाटाळ केली जात आहे, असे ते म्हणाले. चेन्नीथला म्हणाले की, काँग्रेस पक्ष राज्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन, मोर्चे आणि जनजागरण मोहिमा राबवून सरकारला जाब विचारेल.

टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पॉलिटिकल अफेअर्स कमिटीच्या बैठकीत प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकांची रणनीती ठरविण्यात आली. 

बैठकीला विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, नाना पटोले, माणिकराव ठाकरे, नसीम खान, खा. प्रणिती शिंदे, खा. वर्षाताई गायकवाड, बी. एम. संदीप, यूबी व्यंकटेश, पृथ्वीराज साठे, रवींद्र दळवी, मॅथ्यू अॅटनी, विधिमंडळ उपनेते आ. अमिन पटेल, खा. डॉ. कल्याण काळे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन अॅड. गणेश पाटील, मोहन जोशी, वजाहत मिर्झा, सिद्धार्थ हत्ती अंबीरे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, इंटकचे अध्यक्ष कैलाश कदम उपस्थित होते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Government cheated farmers, unemployed: Chennithala, Congress announces statewide agitation.

Web Summary : Congress alleges the government deceived farmers, beneficiaries, and unemployed youth with false promises and inaction on loan waivers. They announced statewide protests.
टॅग्स :काँग्रेस