Join us

दिग्गज नेत्याच्या कार्यालयात पैशांसाठी गोंधळ, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 06:09 IST

Mumbai : एका बड्या नेत्याच्या पीएने नाशिकमधील एका डॉक्टरकडून एका समितीवर नियुक्ती देण्यासाठी लाखो रुपये उकळण्याच्या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा आहे.

मुंबई : एका बड्या नेत्याच्या पीएने नाशिकमधील एका डॉक्टरकडून एका समितीवर नियुक्ती देण्यासाठी लाखो रुपये उकळण्याच्या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा आहे. या डॉक्टरने गुरुवारी त्या नेत्याच्या दालनात पैसे परत देण्यासाठी बराच गोंधळ घातल्याचे सूत्रांनी सांगितले.संबंधित नेत्याच्या स्वीय सहायकाने नाशिकच्या एका  डॉक्टरला केंद्रीय समितीवर सदस्य म्हणून वर्णी लावतो, असा शब्द दिला होता. त्या बदल्यात डॉक्टरने काही लाख रुपये त्या स्वीय सहायकाला दिले. त्यापैकी मोठी रक्कम बँक खात्यावर तर काही रोखीने स्वीकारण्यात आली. मात्र, दोन वर्षे झाली तरी केंद्रीय समितीवर नियुक्ती न झाल्याने संबंधित डॉक्टरला आपली फसगत झाल्याचे निदर्शनास आले; आणि नेत्याच्या दालनात त्यावरूनच गोंधळ घातला. शेवटी त्याची समजूत काढता-काढता दालनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची पुरेवाट झाली.

टॅग्स :मुंबईधोकेबाजीराजकारणगुन्हेगारी