नालेसफाईची ५५ टक्के कामे पूर्ण

By Admin | Updated: May 19, 2014 05:25 IST2014-05-19T05:25:08+5:302014-05-19T05:25:08+5:30

शहरातील पावसाळापूर्व नालेसफाईची कामे वेगाने सुरू आहेत. ५५ टक्के कामे पूर्ण करण्यात आली आहेत

Completed 55% of Nalesfi's works | नालेसफाईची ५५ टक्के कामे पूर्ण

नालेसफाईची ५५ टक्के कामे पूर्ण

नवी मुंबई : शहरातील पावसाळापूर्व नालेसफाईची कामे वेगाने सुरू आहेत. ५५ टक्के कामे पूर्ण करण्यात आली आहेत. आज आयुक्तांनी शहरात पाहणी दौरा करून पेरीस्कोपच्या सहाय्याने गटारांची पाहणी केली. ऐरोली, दिघा व एमआयडीसी परिसरातील पावसाळापूर्व कामांची आज आयुक्त आबासाहेब जºहाड यांनी पाहणी केली. ऐरोली - मुलुंड रस्त्यावर सेक्टर ५ येथे रेल्वे पुलाखाली जंक्शनवर प्रत्येक वर्षी पाणी साचते. सदर ठिकाणी आवश्यक कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. नालेसफाईची कामे बरोबर झाली आहेत का हे पाहण्यासाठी पेरीस्कोप मशीनचा वापर करण्यात आला. या मशीनद्वारे कामांची पाहणी करण्यात आली. दिघामधील सेन्च्युरी नाल्याची साफसफाई, बिंधुमाधवनगरच्या मागील रेल्वे रूळालगतच्या भागात पाणी साचण्याच्या ठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. शहरातील ५५ टक्के कामे पूर्ण झाली असून नागरिकांना पावसाळ्यात त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आल्याची माहितीही आयुक्तांनी दिली आहे. या दौर्‍यात शहर अभियंता मोहन डगावकर, सुरेंद्र पाटील, बाबासाहेब राजाळे, सुरेश पाटील, संजय देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Completed 55% of Nalesfi's works