Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस विजेत्या मेघा धाडेची ‘ही’ इच्छा पूरी करा...   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 22:30 IST

एसटीच्या ७१ व्या वर्धापन दिनाच्या सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला मेघा धाडे यांनी शुभेच्छा दिल्या.

मुंबई : पहिल्या सिझनच्या बिग बॉस विजेत्या मेघा धाडे यांनी एसटीतून फिरण्याची इच्छा एसटीच्या ७१ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने व्यक्त केली. मुंबई सेंट्रल येथील गोकुळदास तेजपाल सभागृहात शनिवारी एसटीचा ७१ वा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मेघा धाडे म्हणाल्या की, सुरूवातीला एसटी वेगळी होती आणि आताची एसटी अत्याधुनिक आणि आरामदायी झाली आहे. त्यामुळे मला एसटीतून फिरण्याची इच्छा होत आहे. आता कारने प्रवास सोडून एसटीतून प्रवास करावेसे वाटते. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सेलिब्रेटींना घेऊन एसटीचा प्रवास करून द्यावा. एसटीचे सर्व कर्मचारी अधिकारी मनापासून प्रवाशांना सेवा देत आहे. त्यामुळे एसटीची प्रगती झाली आहे, असे मेघा धाडे म्हणाल्या. 

याचबरोबर, एसटीच्या ७१ व्या वर्धापन दिनाच्या सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला मेघा धाडे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले की, मेघा धाडे बिग बॉस खेळामध्ये लढवय्या सारख्या लढून जिंकून आल्या. मेघा धाडे जिंकणार हे त्यांच्या खेळातूनच दिसून येत होते. 

टॅग्स :मेघा धाडेबिग बॉस मराठी