Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 17:17 IST

एएनआय या वृत्तसंस्थेने संबंधित वृत्त दिले आहे. 

मुंबई- शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात साकीनाका पोलीस स्थानकात एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने संबंधित वृत्त दिले आहे. 

राहुल शेवाळे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्यावर करण्यात आलेले आरोप निराधार आहे. माझी प्रतिमा खराब करण्याचा हेतू आहे. मी निर्दोष आहे आणि यासाठी मी कोणत्याही चौकशीला तयार आहे. त्याचप्रमाणे माझ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या बोगस तक्रारीमागील लोकांचा मी नक्कीच पर्दाफाश करेल, असं राहुल शेवाळे यांनी सांगितलं. 

टॅग्स :राहुल शेवाळेलैंगिक छळपोलिस