Join us

‘’इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं हे हिंदुत्व नाही, हा महाराष्ट्र द्वेष’’, आदित्य ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 13:16 IST

Aditya Thackeray: इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं हे हिंदुत्व नाही, हा महाराष्ट्र द्वेष आहे! ‘महाराष्ट्राचं खच्चीकरण’ हेच या खोके सरकारचं ध्येय आहे!, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मुंबई - मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्य्रातून सुटकेशी केल्याने नवा वाद सुरू झाला आहे. दरम्यान, ठाकरे गटातील आमदार आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात एक ट्विट करून आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-भाजपा सरकारवर टीका केली आहे. 

या ट्वीटमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं हे हिंदुत्व नाही, हा महाराष्ट्र द्वेष आहे! ‘महाराष्ट्राचं खच्चीकरण’ हेच या खोके सरकारचं ध्येय आहे!, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 

दरम्यान, काल साताऱ्यात प्रतापगड येथे शिवप्रताप दिनी झालेल्या कार्यक्रमामध्ये मंगलप्रभात लोढा यांनी शिंदेंच्या बंडाची तुलना आग्य्रातून सुटकेशी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्य्रातील किल्ल्यात ठेवले होते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी आग्य्रातून नाट्यमयरीत्या सुटका करून घेतली होती. ते तिथून सुटून बाहेर आले त्यामुळेच ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. त्याचप्रकारे एकनाथ शिंदे यांना रोखण्याचे खूप प्रयत्न झाले. मात्र एकनाथ शिंदे बाहेर पडले, असे विधान मंगलप्रभात लोढा यांनी केले होते.

 

टॅग्स :आदित्य ठाकरेछत्रपती शिवाजी महाराजमंगलप्रभात लोढामहाराष्ट्र