वाणिज्यला पसंती, कला शाखेचे आकर्षण कमी, अकरावी पहिल्या फेरीचे कटऑफ आले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 07:33 IST2025-07-18T07:33:31+5:302025-07-18T07:33:51+5:30

अकरावीच्या पहिली फेरीअखेर केवळ ७९,४०३ विद्यार्थ्यांचे प्रवेश

Commerce is preferred, arts branch is less attractive, cutoff for the first round of 11th has come... | वाणिज्यला पसंती, कला शाखेचे आकर्षण कमी, अकरावी पहिल्या फेरीचे कटऑफ आले...

वाणिज्यला पसंती, कला शाखेचे आकर्षण कमी, अकरावी पहिल्या फेरीचे कटऑफ आले...

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या फेरीत एकूण ७९ हजार ४०३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून, यामध्ये वाणिज्य आणि विज्ञान शाखेला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. प्रवेश प्रक्रियेत एसएससी बोर्डाचे वर्चस्व दिसून आले.

राज्यभरात उपलब्ध असलेल्या एकूण २ लाख ७१ हजार ६० जागांपैकी केवळ ७९ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला. त्यामुळे एक लाख ९० हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. ४३,३५४ विद्यार्थ्यांनी वाणिज्य, तर विज्ञान शाखेत २८,८२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. 

कला शाखेत केवळ ७,२२७ (४५,००० जागा) विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. ७१,३९१ प्रवेश एसएससी बोर्ड, सीबीएसईतून ३,२६२ तर आयसीएसईतून ३,१५४ प्रवेश झाले, असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

पुणे विभागात सर्वाधिक ९१,००७ प्रवेश झाले. विज्ञान शाखेत सर्वाधिक ४०,८१५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
सर्वात कमी प्रवेश अमरावती विभागात २६,१४४ नोंदवले गेले.
विज्ञान शाखेत एकूण २,०७,४२१ प्रवेश झाले.
कला शाखेत १,५८,६१६ प्रवेश.
वाणिज्य शाखेत १,३९,५७१ प्रवेश.

अकरावीचे  कट-ऑफ
महाविद्यालय    कला    वाणिज्य    विज्ञान
एच. आर. कॉलेज    -    ४६६     -
सेंट झेविअर्स कॉलेज    ४५७    -    ४५५
के. सी. कॉलेज    ३८४    ४५९    ४१७ 
जय हिंद कॉलेज    ४१५    ४५९    ४२४
रुईया कॉलेज    ४२९,    -    ४६७ 
आर. ए. पोदार कॉलेज    -    ४७२    -
डॉ. डी. जी. रुपारेल कॉलेज    ४२३    ४५५    ४५४ 
एसआयईएस कॉलेज    -    ४३२    -
साठ्ये कॉलेज    ३९५    ४४७    ४५२ 
एम. एल. डहाणुकर कॉलेज    -    ४५५    -
भवन्स कॉलेज, अंधेरी    ३९२    ४४७    ४४६ 
मिठीबाई कॉलेज    ४१९    ४५६    ४४३ 
एन. एम. कॉलेज    -    ४६३    -
व्ही. जी. वझे कॉलेज    ४४६    ४६६    ४६० 
मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स    -    ४६४    - 
बी. एन. बांदोडकर कॉलेज    -    -    ४५७ 
सी. एच. एम. कॉलेज    ३२६    ४२०    ४५४ 
फादर ॲग्नेल ज्युनिअर कॉलेज    -    ४३७    ४६५ 
सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज    २५२    ३५९    ४३९ 
बी. के. बिरला कॉलेज    ४३०    ४६६    ४६९

Web Title: Commerce is preferred, arts branch is less attractive, cutoff for the first round of 11th has come...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.