दिलासादायक! मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत घट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 02:47 AM2021-05-04T02:47:26+5:302021-05-04T02:47:44+5:30

२४ तासांत केवळ २ हजार ६६२ रुग्ण

Comfortable! Daily decline in the number of patients in Mumbai | दिलासादायक! मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत घट

दिलासादायक! मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत घट

googlenewsNext

मुंबई : मुंबईत आता शहर उपनगरातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा ६ लाख ५८ हजार ८६६ झाला असून बळींचा आकडा १३ हजार ४०८ झाला आहे. सध्या ५४ हजार १४३ रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईत दिवसभरात २३ हजार ५४२ चाचण्या करण्यात आल्या तर एकूण ५५ लाख १३ हजार ७८३ कोरोना चाचण्या कऱण्यात आल्या आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा  दर ८९ टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १११ दिवसांवर पोहोचला आहे. २६ एप्रिल ते २ मे पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.६१ टक्के असल्याचे दिसून आले आहे. मुंबईतील झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात ९३ सक्रिय कंटेनमेंट झोन्स असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ८१४  आहे.

मुंबईत एप्रिलअखेरीस पासून दैनंदिन कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी केल्यामुळे रुग्णसंख्येत घट होताना दिसतेय आहे. मुंबईत सोमवारी (३ मे) अवघ्या २३ हजार ५४२ चाचण्या केल्या असता २६६२ रुग्णांचे निदान झाले. यापूर्वी, मुंबईत २५ एप्रिल रोजी दिवसभरात ४० हजार २९८ चाचण्या कऱण्यात आल्या होत्या, त्यात ५५४२ रुग्ण आढळले होते.
 

Web Title: Comfortable! Daily decline in the number of patients in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.