Join us  

अत्यावश्यक गरज असेल तरच गावाकडे या, पुणे-मुंबईतील गावकऱ्यांना पालकमंत्र्यांची साद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 3:47 PM

केंद्र सरकारने शिथिलता दिल्यानतर तब्बल ४१ दिवसानंतर मजुरांचा स्वगृही जाण्याचा मार्ग सुकर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते.

कोल्हापूर -  लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी आणि पर्यटक अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शिथिलता दिल्यानंतर या सर्वच नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात येत आहे. त्यासाठी, रेल्वे, बस आणि खासगी वाहनांने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. परराज्यातील मजूरांना स्पेशल श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून राज्य सरकारने त्यांच्या राज्यात पाठविण्यात सुरुवात केली आहे. तर, जिल्ह्यांतर्गतही स्थलांतरीतांची घरवापसी होत आहे. मात्र, पुणे आणि मुंबईतून गावाकडे येणऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोना संक्रमण वाढण्याचा धोका कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

केंद्र सरकारने शिथिलता दिल्यानतर तब्बल ४१ दिवसानंतर मजुरांचा स्वगृही जाण्याचा मार्ग सुकर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर विविध राज्यातील मजूर राज्यातील विविध भागात अडकलेले होते. आता अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे मजूर गावी जाताना दिसत आहेत. तर, पुणे आणि मुंबईतूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक गावाकडे जात आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ई-पास सुविधेचा लाभ घेऊन हे शहरातील नागरिक गावी परतत आहेत. मात्र, या नागरिकांमुळे धोका वाढण्याची शक्यता गृहराज्यमंत्री सतेज पाटील यानी वर्तवली आहे. 

आम्ही गेल्या २ महिन्यापांसून ४० लाख नागरिकांची काळजी घेत आहोत, या सर्वच नागरिकांना कोरोनाच्या प्रादुर्भावापासून दूर ठेवले आहे. मात्र, पुणे आणि मुंबईतून गावाकडे येणाऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोनाच शिरकाव होऊ शकतो, अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली. तसेच, जर अत्यावश्यक गरज असेल तर गावाकडे या, अन्यथा जिथं आहात तिथंच राहा, अशी विनंतीही पाटील यांनी केली आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊनच पोलीस विभागाने ई-पास द्यावेत, अशी मागणीही आम्ही पोलीस विभागाकडे केल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :सतेज ज्ञानदेव पाटीलपुणेमुंबईस्थलांतरणकामगार