खळबळजनक! फाईव्ह स्टार हॉटेलच्या स्टोअर्समध्ये सापडली झुरळे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 07:18 AM2021-03-06T07:18:17+5:302021-03-06T07:18:28+5:30

मुदतबाह्य अन्नसाठा केला नष्ट; वांद्रे येथे अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

Cockroaches found in Taj Lands & Hotel stores | खळबळजनक! फाईव्ह स्टार हॉटेलच्या स्टोअर्समध्ये सापडली झुरळे 

खळबळजनक! फाईव्ह स्टार हॉटेलच्या स्टोअर्समध्ये सापडली झुरळे 

Next

मुंबई : वांद्रे येथील ताज लॅन्ड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली असून, मुदतबाह्य अन्न साठा नष्ट 
करून स्टोरेज कक्षातील झुरळांचा प्रादुर्भाव दूर होईपर्यंत स्टोअरेज कक्ष बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचा एक भाग म्हणून ताज लॅन्ड्स एन्डमध्ये तीन मार्च रोजी प्रशासनामार्फत तपासणी करण्यात आली. तपासणीत अन्न पदार्थ साठविण्याच्या काही फ्रीजवर तापमान निदर्शक यंत्रणा नव्हती. 
तसेच चिज, कलिंगड ज्यूस, इडलीचे पीठ, फळाचे रस, ग्रीन ॲपेल इत्यादी अन्नपदार्थाचा मुदतबाह्य साठा अन्नपदार्थ तयार करण्यासाठी साठविल्याचे लक्षात आले. मुख्य किचनमधील अन्नपदार्थ स्टोरेज 
कक्षात झुरळांचा प्रादुर्भाव दिसल्याने हे स्टोरेज कक्ष झुरळांचा प्रादुर्भाव 
दूर होईपर्यंत बंद करण्याचे तत्काळ निर्देश देण्यात आले. तसेच मुदतबाह्य अन्नपदार्थाचा साठा तत्काळ जनआरोग्याच्या हितार्थ नष्ट करण्यात आला. ही कारवाई पंचतारांकित तसेच तत्सम हॉटेलांच्या तपासणीसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाचे अन्नसुरक्षा अधिकारी जी. एम. कदम, अन्नसुरक्षा अधिकारी यो. सू. कणसे, सहायक आयुक्त (अन्न) एम. एन. चौधरी यांनी केली.

Read in English

Web Title: Cockroaches found in Taj Lands & Hotel stores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.