जोरदार वारे लावणार बुलेट ट्रेन ' ब्रेक '

By सचिन लुंगसे | Published: March 26, 2024 05:51 PM2024-03-26T17:51:21+5:302024-03-26T17:56:54+5:30

मुंबई ते अहमदाबादपर्यंतचा बुलेट ट्रेनचा मार्ग हा जमिनीपासून ५ ते १५ मीटर उंचीवर आहे.

coastal winds are likely to affect bullet train speed and operations anemometers will be installed at 14 places in maharashtra and gujarat as a precautionary measure | जोरदार वारे लावणार बुलेट ट्रेन ' ब्रेक '

जोरदार वारे लावणार बुलेट ट्रेन ' ब्रेक '

मुंबई : मुंबई आणि अहमदाबादला जोडणारी बुलेट ट्रेन किनारपटटी भागातून जाणार असून, या किनारपटटी भागातील वा-याचा बुलेट ट्रेनच्या वेगासह कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यावर खबरदारीची उपाय योजना म्हणून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये १४ ठिकाणी अ‍ॅनिमोमीटर बसविण्यात येणार असून, त्याद्वारे वा-याचा वेग मोजता येईल आणि बुलेट ट्रेनचा वेग नियंत्रणात ठेवता येईल.

मुंबई ते अहमदाबादपर्यंतचा बुलेट ट्रेनचा मार्ग हा जमिनीपासून ५ ते १५ मीटर उंचीवरआहे. या उंचीवरून बुलेट ट्रेन धावताना तिला वा-याचा वेगाचाही सामना करावा लागणार आहे. विशेषत: समुद्र किनारपटटीवरून वेगाने वारे वाहतात. अनेक चक्रीवादळाचीही शक्यता असते. अशा घटनांत बुलेट ट्रेन किती वेगाने चालवायची किंवा थांबावायची ? याचा निर्णय घेण्यासाठी अ‍ॅनिमोमीटर मदत करणार आहेत.

बुलेट ट्रेन धावणा-या व्हायाडक्टवर १४ ठिकाणी ॲनिमोमीटर बसवले जातील. ही उपकरणे वाऱ्याच्या गतीचे निरीक्षण करतील. नदीवरील पूल आणि वादळी वारे यावर लक्ष केंद्रित करतील.

ट्रेनचा वेग -

जर वा-याचा वेग २० मीटर प्रति सेकंद ते ३५ मीटर प्रति सेकंद पर्यंत असेल तर ट्रेनचा वेग त्यानुसार ठरविला जाईल.

वा-याचा वेग ३५ मीटर प्रति सेकंदपेक्षा जास्त असल्यास खबरदारीचा उपाय म्हणून ट्रेन थांबविली जाईल. अशा परिस्थितीत, वा-याचा वेग तुलनेने कमी असलेल्या सुरक्षित ठिकाणी, जसे की बोगदे किंवा डोंगराच्या दुतर्फा गाड्या थांबवल्या जातील.

ऑपरेशन कंट्रोल सेंटर विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या ॲनिमोमीटरद्वारे वा-याच्या वेगावर लक्ष ठेवेल.

ॲनिमोमीटरद्वारे  ही आपत्ती प्रतिबंधक प्रणाली आहे. जी ०-७० मीटर प्रति सेकंदच्या मर्यादेत वास्तविक वेळेच्या वा-याच्या वेगाची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

स्थान / राज्य :

देसई खाडी / महाराष्ट्र

उल्हास नदी / महाराष्ट्र

बंगाला पाडा / महाराष्ट्र

वैतरणा नदी / महाराष्ट्र

डहाणू / महाराष्ट्र

दमणगंगा नदी / गुजरात

पार नदी / गुजरात

नवसारी / गुजरात

तापी नदी / गुजरात

नर्मदा नदी / गुजरात

भरुच-वडोदराच्या मध्यभागी / गुजरात

मही नदी / गुजरात

बरेजा / गुजरात

साबरमती नदी / गुजरात

Web Title: coastal winds are likely to affect bullet train speed and operations anemometers will be installed at 14 places in maharashtra and gujarat as a precautionary measure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.