Join us  

कोचिंग क्लासेसमुळे विद्यार्थ्यांची सृजनशीलता थांबली, शिक्षणकट्टयावरील सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 3:05 PM

कोचिंग क्लासेसमुळे विद्यार्थ्यांची सृजनशीलता थांबली त्यामळे विद्यार्थी परिक्षार्थी बनले आहेत. असा सूर शिक्षणकट्टयावर दिसून आला.विद्यार्थी व शिक्षण व्यवस्था ही परीक्षार्थी बनल्याने  कोचिंग क्लास संस्कृती वाढली.शाळांनी आपला शैक्षणिक दर्जा वाढविल्यास क्लासची गरजच उरणार नाही असे मत शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी यावेळी व्यक्त केले.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - कोचिंग क्लासेसमुळे विद्यार्थ्यांची सृजनशीलता थांबली त्यामळे विद्यार्थी परिक्षार्थी बनले आहेत. असा सूर शिक्षणकट्टयावर दिसून आला.विद्यार्थी व शिक्षण व्यवस्था ही परीक्षार्थी बनल्याने  कोचिंग क्लास संस्कृती वाढली.शाळांनी आपला शैक्षणिक दर्जा वाढविल्यास क्लासची गरजच उरणार नाही असे मत शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी यावेळी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, शिक्षण विकास मंच आयोजित शिक्षणकट्टयावर "खाजगी कोचिंग क्लास" या विषयावर नुकतीच चर्चा ठेवण्यात आली होती.

राज्यात 50000 कोचिंग क्लासेस असून काही क्लासेस सामाजिक गरज म्हणून चालविण्यात येतात. यामुळे यावर अन्याय होईल असा निर्णय घाईघाईत सरकारने घेऊ नये.भरमसाठ फीस आकारून पैसा कमविणारे फक्त दहा टक्के क्लासेसवाले आहेत.त्याचा फटका लहान क्लासवाल्याना बसत आहे असा तक्रारीचा सूर देखील यावेळी वक्त्यांनी विषद केला.महाराष्ट्र शासनाच्याकडून राज्यातील खाजगी शिकवणी वर्ग नियंत्रणासाठी एक विधेयक प्रस्तावित आहे त्याचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे.यास अनुसरून ही चर्चा ठेवण्यात आली होती. कट्टयाची सुरूवात बसंती रॉय यांच्या प्रस्ताविकाने झाली.

शिक्षणकट्टयावर हा विषय चर्चेला ठेवण्यामागचे प्रयोजन त्यांनी स्पष्ट केले. खाजगी कोचिंग क्लासेस ही समांतर शिक्षण पद्धती आज समाजात मान्यता पावली आहे.यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा बनवावा याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.यास अनुसरून राज्यशासनाने हा मसुदा तयार केला आहे.

 आजच्या स्पर्धेच्या काळात माझे मूल हे सर्वाच्या पुढे गेले  पाहिजे ही मानसिकता व  सोबतीला प्रतिष्ठेचा सिबाॅल ठेवून पालक मुलांना खाजगी क्लासेसला पाठवितात.शिक्षकांना आपला अभ्यासक्रम शाळेत पूर्ण करता येत नाही,कारण अध्यापनासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ नाही परिणामी मुले खाजगी क्लासला जातात.शाळा आणि क्लास याच्यांत समन्वय असावा यामुळे मुलावरील दडपण कमी होईल.शाळा आणि कोचिंग क्लासेस हया दोन्ही व्यवस्था चुकीच्या नाहीत यामुळे त्या परस्परपूरक होणे गरजेचे आहे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

 ज्यु.काॅलेजची व्यवस्था पूर्ण ढेपाळली आहे यामुळेच टायप,इंटीग्रेटेड क्लास उदयास आले आहेत.कोचिंग क्लासेसचा मसुदा मोठे क्लासवाले डोळयासमोर ठेवून बनविला आहे. यातून लहान व मराठी माध्यमाचे क्लास वगळावेत.पालकांना सरकारने शाळा आणि क्लास असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून दयावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 शिक्षणकट्टयाच्या समारोप प्रसंगी सर्व चर्चेचा आढावा डाॅ. वसंतराव काळपांडे यांनी घेतला. विद्यार्थीहीत डोळ्यासमोर ठेवून शिक्षण विकास मंच कार्यरत आहे हीच भूमिका कोचिंग क्लासेस चालविणार्यानी घ्यावी असे प्रतिपादन केले.शिक्षक,मुख्याध्यापक,प्राध्यापक,प्राचार्य, पालक,अभ्यासक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माधव सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टॅग्स :शैक्षणिकशिक्षण क्षेत्रविद्यार्थी