Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे दादरमधील चैत्यभूमीवर; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 10:56 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.

मुंबई- आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत होती. मात्र यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने, पण आरोग्याची काळजी घेऊन साजरी करण्यात येत आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मुंबईमधील दादर, चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. तसेच त्यांच्या कॉफी टेबल बुक प्रदर्शनासही भेट दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीच्या निमित्ताने नागपुरात दीक्षाभूमीवर वेगळाच उत्साह दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्ष बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीवर प्रवेश बंद होता. मात्र यंदा निर्बंध मुक्त वातावरणात बाबासाहेबांची जयंती साजरी केली जात असून मोठ्या संख्येने बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे अनुयायी दीक्षाभूमीवर येत आहेत.

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकरउद्धव ठाकरे