Join us  

Omicron Updates: ओमायक्रोनबाबत आढावा घेणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् टास्क फोर्सची बैठक होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 5:33 PM

जगभरातील ३८ देशामध्ये पसरलेला कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट आता भारतातही वेगाने फैलावत आहे.

मुंबई: जगभरातील ३८ देशामध्ये पसरलेला कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट आता भारतातही वेगाने फैलावत आहे. केवळ चार दिवसांमध्ये देशातील ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे. २ डिसेंबर रोजी देशात ओमायक्रॉनची बाधा झालेला पहिला रुग्ण सापडला होता. तेव्हापासून ६ डिसेंबरपर्यंत या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २१ पर्यंत पोहोचली आहे.

राज्यात डोंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला बाधित आढळला. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये ७ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली. भारतीय वंशाची महिला २४ नोव्हेंबरला नायजेरियातून पिंपरी-चिंचवड शहरात आली होती. सोबत तिच्या दोन मुलीही होत्या. या तिघींच्या संपर्कात आलेल्या १३ जणांची तपासणी केली असता महिलेचा भाऊ, दोन मुली अशा सहा जणांनाही लागण झाल्याचे उघड झाले. पुण्यातील ओमायक्राॅन बाधित फिनलँड येथून परतला हाेता. 

ओमायक्रोनचे संकट वाढत आहे. त्यामुळे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागरिकांना नियमांचे कठोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात ओमायक्रोनचे वाढते रुग्ण पाहता एअरपोर्ट्स आणि इतर ठिकाणी कोविड टेस्टिंगचे प्रमाण वाढवण्यात आले आहे अशी माहिती देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी दिली. ओमायक्रोनवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठक होणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. पुढील दोन तीन दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन ओमायक्रोनचे संकट परतवण्यासाठी आणखी कडक निर्बंध घालायचे की नाही यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देखील आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

ओमायक्रॉनचे रुग्ण जगभरात वाढत असताना आता देशातही मोठ्या वेगाने सापडू लागले आहेत. ओमायक्रॉनमुळे लसीचे दोन डोस घेतलाला व्यक्तीही संक्रमित होत आहे. याचाच अर्थ तुम्ही लस घेतली असेल तरी देखील ओमायक्रॉन तुम्हाला बाधित करू शकतो. यामुळे कोरोनाचे नियम पाळणे, काळजी घेणे या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. 

दरम्यान, आतापर्यंत ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले जे रुग्ण सापडले आहेत. ते हल्लीच दक्षिण आफ्रिकेचा दौरा करून आलेले होते किंवा हाय रिस्क देशांमधून प्रवास करून आलेल्या लोकांच्या संपर्कात होते. आता ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू शकते. कारण अनेक संशयित रुग्णांचा रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहे. त्यांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच बाधितांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचे ट्रेसिंगही करण्यात आले आहे.

टॅग्स :ओमायक्रॉनउद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकारकोरोना वायरस बातम्या