पालकांविषयी रणवीर अलाहाबादियाचे अश्लील विधान; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "...तर कारवाई होणार"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:57 IST2025-02-10T13:35:06+5:302025-02-10T13:57:34+5:30
यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या विधानावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पालकांविषयी रणवीर अलाहाबादियाचे अश्लील विधान; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "...तर कारवाई होणार"
Ranveer Allahbadia Remark: कॉमेडियन समय रैनाचा इंडियाज गॉट लेटेंट हा शो सध्या वादात पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून समयसोबत असणाऱ्या होस्टने केलेल्या विधानांमुळे अनेकांनी इंडियाज गॉट लेटेंटवर टीकेची झोड उठली आहे. अशातच यूट्यूबर आशिष चंचलानी, अपूर्व मुखिजा, रणवीर अलाहाबादिया हे कलाकार शोच्या नवीन एपिसोडमध्ये दिसले आहेत. या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने एकाला असा प्रश्न विचारलाय की हे प्रकरण आता थेट मुंबई पोलिसांकडे गेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणवीर अलाहाबादियाने केलेल्या विधानावरुन प्रतिक्रिया दिली आहे.
कॉमेडियन समय रैनाच्या स्टँड-अप कॉमेडी शो इंडियाज गॉट लेटेंट'मध्ये आक्षेपार्ह विधआन केल्याबद्दल यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शोमध्ये अश्लील विधाने केल्याबद्दल वकील आशिष राय आणि इतरांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अश्लील विधाने करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे म्हटलं.
"मलाही याबाबत माहिती मिळाली आहे. मी तो शो पाहिलेला नाही. शोमध्ये अपमानास्पद आणि अश्लील गोष्टी बोलल्या गेल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे जे चुकीचे आहे. प्रत्येकाला भाषणस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण जेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करतो तेव्हा आपले स्वातंत्र्य संपते. भाषण स्वातंत्र्यालाही मर्यादा आहेत. आपल्या समाजात आपण अश्लीलतेबाबतही काही नियम तयार केले आहेत. जर ते नियम कोणी ओलांडले असतील ही चुकीची गोष्ट आहे. असे काही घडले असेल तर नक्कीच कारवाई केली जाईल," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काय म्हणाला रणवीर अलाहाबादिया?
रणवीरने शोमधील एका स्पर्धकाला 'तुला आयुष्यभर तुझ्या आई-वडिलांना दररोज जवळीक साधताना बघायला आवडेल की एकदा त्यांच्यासोबत सामील व्हायला आवडेल?' असा धक्कादायक प्रश्न विचारला. हे ऐकल्यानंतर समय रैनाने हे सर्व पॉडकास्टचे नाकारलेले प्रश्न आहेत. हा कसला प्रश्न आहे? असं म्हटलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रणवीरवर जोरदार टीका होत आहे.