व्हॉट्सॲप ग्रुपवरील ‘पॉर्न लिंक’ क्लिक करणे तरुणाला महागात; झाली लाखोंची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 10:52 IST2026-04-06T10:51:07+5:302026-04-06T10:52:17+5:30

याप्रकरणी भांडुप पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

Clicking on 'porn link' on WhatsApp group cost youth dearly; fraud of lakhs | व्हॉट्सॲप ग्रुपवरील ‘पॉर्न लिंक’ क्लिक करणे तरुणाला महागात; झाली लाखोंची फसवणूक

व्हॉट्सॲप ग्रुपवरील ‘पॉर्न लिंक’ क्लिक करणे तरुणाला महागात; झाली लाखोंची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सोशल मीडियावर येणाऱ्या लिंकवर क्लिक करणे किती धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय भांडुप येथील ३० वर्षीय तरुणाला आला आहे. व्हॉट्सॲप ग्रुपवर आलेल्या एका ‘पॉर्न’ फाइलच्या मोहात त्याच्या बँक खात्यातून तीन लाख ५९ हजार रुपये लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाच्या गावाकडील मित्रांचा  एक व्हॉट्सॲप ग्रुप असून, त्यावर मनोरंजनात्मक पोस्ट शेअर केल्या जातात. २८ मार्चला या ग्रुपवर ‘कॉलेज गर्ल लाइव्ह पॉर्न एपीके’ फाइल आली. कुतूहलापोटी त्याने त्या फाइलवर क्लिक करताच त्याचा मोबाइल हॅक झाला. सायबर भामट्याने त्याच्या मोबाइलवर ताबा मिळवत खात्यातून तीन लाख ५९ हजर रुपये ऑनलाइन पद्धतीने वळते केल्याचे समोर आले.

सायबर भामट्यांची फसवणुकीची पद्धत अशी:

सायबर भामटे एपीके फाइल पाठवून नागरिकांच्या मोबाइलचा परस्पर ताबा मिळवितात. त्यानंतर ऑनलाइन बँकिंग तपशील, ओटीपीद्वारे त्यांच्या बँक खात्यावरील पैसे परस्पर इतरत्र वळते करतात. सुरुवातीला भामट्यांनी बोगस ई-चालानद्वारे नागरिकांना एपीके फाइल पाठवल्या. ज्यांनी त्या क्लिक केल्या, उघडल्या त्यांची फसवणूक झाली. त्यामुळे कोणतीही लिंक क्लिक करू नका, एपीके फाइल्स डाउनलोड करू नका आणि बँकिंग माहिती कोणालाही देऊ नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Web Title : व्हाट्सएप पर पोर्न लिंक क्लिक करने से युवक को लाखों का नुकसान; धोखाधड़ी

Web Summary : भांडुप के एक युवक ने व्हाट्सएप पर एक पोर्नोग्राफिक लिंक पर क्लिक करने के बाद ₹3.59 लाख खो दिए। उसका फोन हैक कर लिया गया और ऑनलाइन लेनदेन के माध्यम से पैसे निकाल लिए गए। पुलिस ने मामला दर्ज कर अज्ञात लिंक पर क्लिक करने और धोखाधड़ी को रोकने के लिए एपीके फाइलें डाउनलोड करने के खिलाफ चेतावनी दी है।

Web Title : Porn link click on WhatsApp cost youth lakhs; fraud occurred.

Web Summary : A youth in Bhandup lost ₹3.59 lakhs after clicking a pornographic link on WhatsApp. His phone was hacked, and money was siphoned through online transactions. Police have registered a case, warning against clicking unknown links and downloading APK files to prevent fraud.