मुंबई : सोशल मीडियावर आकर्षक जाहिरातीवर क्लिक करणे एका केंद्रीय सुरक्षा दलातील अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले. सायबर भामट्यांनी मोबाइल हॅक करत त्यांच्या खात्यातून ३४ हजार रुपये लंपास केले. अँटॉप हिल परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘सीआयएसएफ’मध्ये कार्यरत असलेले निरीक्षक मोबाइलवर इन्स्टाग्राम पाहात होते. याचवेळी त्यांना एक जाहिरात दिसली. सबस्क्राइब करण्यासाठीच्या लिंकवर क्लिक करताच त्यांचा मोबाइल हँग होऊन आपोआप अपडेट मोडवर गेला. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मोबाइलवर फोन पे ॲप तपासले असता त्यांच्या बँक खात्यात फक्त ८२ रुपये दिसून आले.या पूर्वी त्यांच्या खात्यात ३४ हजार रुपये होते. ९ मार्चला बँकद्वारे तपासणी केली असता कृष्णा यादव याच्या नावे रक्कम वळती झाल्याचे आढळल्याने अँटॉप हिल पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याप्रकरणी तक्रार दाखल करून गुन्हा नोंद केला आहे.
Web Summary : A CISF officer in Mumbai lost ₹34,000 after clicking an ad on Instagram. His phone was hacked, and money was transferred to Krishna Yadav's account. A police complaint has been filed at Antop Hill Police Station.
Web Summary : मुंबई में एक CISF अधिकारी को इंस्टाग्राम पर एक विज्ञापन पर क्लिक करना महंगा पड़ा। उनके फोन को हैक कर लिया गया और कृष्णा यादव के खाते में ₹34,000 ट्रांसफर कर दिए गए। एंटॉप हिल पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज की गई है।