जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आरेतील स्वच्छता अभियान, ५० टन कचरा झाला गोळा

By मनोहर कुंभेजकर | Published: June 5, 2023 04:32 PM2023-06-05T16:32:30+5:302023-06-05T16:34:12+5:30

कचर्‍याचे सुमारे ५० डब्बे व कचरा गोळा करायच्या पिशव्या दिल्या होत्या.

Cleanliness campaign in Arey on the occasion of World Environment Day, 50 tonnes of waste was collected | जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आरेतील स्वच्छता अभियान, ५० टन कचरा झाला गोळा

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आरेतील स्वच्छता अभियान, ५० टन कचरा झाला गोळा

googlenewsNext

मुंबई :‘स्वच्छ आरे, सुंदर आरे’ अशी भावना बाळगत निसर्ग रम्य असे वातावरण लाभलेल्या तसेच मुंबईचे फुफुस अशी ओळख असलेल्या आरेत आज स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

सकाळी ७ वाजल्यापासून आरेच्या विविध भागांमध्ये आदर्शनगर, गौतम नगर, न्युझीलंड हॉस्टेल, मयुर नगर, विविध पाडे व युनिटमध्ये स्वच्छता मोहिमेला सुरूवात झाली. या स्वच्छता मोहिमेत आरेच्या विविध भागांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या व बाटल्या तसेच विविध भागांमध्ये कचरा साठल्याचे चित्र दिसून आले. 

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांचे मार्गदर्शनाखाली व त्यांच्या उपस्थितीत आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात सुमारे ५० टन कचरा गोळा करुन विविध परिसर स्वच्छ करण्यात आले.त्यांनी कचर्‍याचे सुमारे ५० डब्बे व कचरा गोळा करायच्या पिशव्या दिल्या होत्या.

यासंदर्भात आमदार वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या के-पूर्व, पी-दक्षिण, ऑबेरॉय स्प्लेंडरचे रहिवाशी, विविध सामाजिक संस्था, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, आरे प्रशासनाचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी या समवेत संयुक्त बैठक घेऊन कार्यक्रमाचे नियोजन केले होते. स्वयंसेवी संस्था, दत्तकवस्ती योजना, मनपाचे सफाई कर्मचारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत शिवसेना उपनेते व युवासेना सरचिटणीस अमोल किर्तीकर यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेचा श्रीफळ वाढविण्यात आला.

 मनपाच्या पी-दक्षिण व के-पूर्व विभाग कार्यालयाने जेसीब व डंम्परच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात कचरा गोळा केला.पी-दक्षिण विभागाने प्लास्टिक सुका कचरा (२ टन), मिक्स कचरा (१२ टन) व डेब्रिज इ. (२० टन) कचरा गोळा केला. ऑबेरॉय स्प्लेंडरमधील रहिवाशांनी तसेच क्लिन आरेचे जल्पेश मेहता व त्यांच्या टिमने तसेच ऑबेरॉय इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य व विद्यार्थ्यांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभागी घेतला होता.

 या मोहिमेत पी-दक्षिणचे सहा अभियंता तुषार पिंपळे, दुय्यम अभियंता संदिप माटेकर, सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक श्याम शिंदे, पर्यवेक्षक रवि लोखंडे,के पूर्वचे उप-अभियंता विनायक आवळे, वनविभागाचे अधिकारी, आरे प्रशासनाचे कर्मचारी, शिवसेनेचे विधानसभा संघटक विश्‍वनाथ सावंत, महिला संघटक शालिनी सावंत, माजी नगरसेविका रेखा रामवंशी, उपविभागप्रमुख जितेंद्र वळवी, शाखाप्रमुख मंदार मोरे, बाळा तावडे, अपर्णा परळकर, हर्षदा गावडे, मयुरी रेवाळे, पुजा शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Cleanliness campaign in Arey on the occasion of World Environment Day, 50 tonnes of waste was collected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.