सफाईचे काम जोरात, कचरा उचलण्यासाठी विशेष लोकल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 03:41 AM2019-07-01T03:41:05+5:302019-07-01T03:41:30+5:30

तिन्ही मार्गाच्या स्थानकादरम्यान कचऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

Clean work, special locals to pick up garbage | सफाईचे काम जोरात, कचरा उचलण्यासाठी विशेष लोकल

सफाईचे काम जोरात, कचरा उचलण्यासाठी विशेष लोकल

googlenewsNext

मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील कचरा, माती, रेती उचलण्याचे काम जोरात सुरू आहे. हा कचरा उचलण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कचरा विशेष लोकल चालविण्यात येत आहे. वर्षभरात मध्य रेल्वे मार्गावर १ लाख घनमीटर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर १ लाख ८० हजार घनमीटर कचरा विशेष कचरा लोकलने मध्य रात्री उचण्यात आला आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते कल्याण, हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते मानखुर्द आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते विरारपर्यंत या स्थानकादरम्यान कचरा उचलण्याचे काम जोरात सुरू आहे. दररोज मध्यरात्रीच्या वेळी चार डब्यांच्या दोन विशेष कचरा लोकलद्वारे रूळलगत, रेल्वे परिसरातून, नाल्यातून दररोज १२ हजार गोण्या कचरा उचलण्यात येतो. गोळा केलेला कचरा विरार येथील रेल्वेच्या जुन्या खाणीसह अन्य ठिकाणी जमा केला जात आहे. कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाकडून रेल्वेलगतच्या रहिवाशांमध्ये जनजागृती केली जात आहे.
तिन्ही मार्गाच्या स्थानकादरम्यान कचऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पावसाळ््यात रेल्वे रूळ पाणी साचण्याच्या घटना जास्त होतात. लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना कचºयांच्या दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे.

देशातील ५ हजार स्थानकांची स्वच्छता
‘स्वच्छता-ही-सेवा’ या मोहिमेंतर्गत देशातील ५ हजार स्थानकांची स्वच्छता करण्यात आली आहे. यासह सर्व मेल, एक्स्प्रेसची स्वच्छता करण्यात आली असून या मोहिमेत १० लाखांपेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता. भारतीय रेल्वेमध्ये २ आॅक्टोबर २०१८ रोजीपासून ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत’, ‘स्वच्छता-ही-सेवा’ मोहिम राबविण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत देशातील ९१० स्थानकावर साफसफाई करण्यासाठी मशीन, वॅक्युम क्लिनर वापर करण्यात येत आहे. देशात १२६ रेल्वे स्थानकावर १६६ प्लॅस्टिक वॉटल क्रॅश मशीन बसविण्यात आली आहे. ५५ हजार मेल, एक्स्प्रेस डब्यात २ लाखांहून जास्त बायोटॉयलेट बसविण्यात आले आहे. स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यास ३४५ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.

मध्य रेल्वेच्या ताफ्यात आणखी चार एसी लोकल
मध्य रेल्वे मार्गावर सप्टेंबर महिन्यांपासून दर महिन्याला एक एसी लोकल येणार आहे. अशा प्रकारे चार महिन्यांत चार एसी लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.
सर्वप्रथम पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकल २५ डिसेंबर, २०१७ रोजी धावली. पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांनी एसी लोकलला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दर्शविला. दर महिन्यांला ३ ते ४ लाख प्रवासी एसी लोकलमधून प्रवास करतात. यासह आता आणखी दोन एसी लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होतील. दुसरीकडे बºयाच कालावधीपासून मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी एसी लोकलच्या प्रतीक्षेत होते. त्यांच्यासाठी आता खूशखबर आहे. कारण हिवाळ्याच्या मोसमात चार एसी लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
या लोकल भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) बनावटीच्या असण्याची शक्यता आहे. तांत्रिक अडचणींमुळे भेल बनावटीची लोकल संपूर्ण एसी डब्याची असेल. भेल बनावटीची सेमी एसी लोकल बनविणे सध्यातरी शक्य नसल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले. मेक इन इंडियामधील मेधा बनावटीच्या लोकल या सेमी एसी लोकल बनविण्यात येण्याची शक्यता असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकलचे तिकीट भाडे हे प्रथम श्रेणीच्या १.३ पट जास्त असण्याची शक्यता आहे. एसी लोकलच्या एका दिवसाच्या एका तिकिटासाठी प्रवाशाला कमीतकमी ६० रुपये ते जास्तीतजास्त २९५ रुपये किमतीचे तिकीट खरेदी करावे लागेल.

Web Title: Clean work, special locals to pick up garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.