भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
By मनोहर कुंभेजकर | Updated: May 18, 2025 15:24 IST2025-05-18T15:23:42+5:302025-05-18T15:24:27+5:30
निवृत्त सैनिकांचा सन्मान करून यात्रेचा समारोप

भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
मनोहर कुंभेजकर, मुंबई: ऑपरेशन सिंदूरच्या अद्भुत यशानंतर, भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि धाडसाला सलाम करण्यासाठी 'तिरंगा पदयात्रा' कांदिवली पूर्व विधानसभेतील समस्त नागरिकांनी कांदिवली पूर्व आणि मालाड पूर्व येथे आयोजित केली होते. या पदयात्रेला कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर उपस्थित होते. आपल्या भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. भारतीय सैन्याच्या धाडसाला आणि शौर्याला आम्ही सलाम करतो, आम्हा सर्वांनाच त्यांचा अभिमान आहे अशा कृतज्ञ भावना आमदार भातखळकर यांनी व्यक्त केल्या.
आज माझ्या कांदिवली पूर्व मतदारसंघातील मालाड पूर्व मंडळामध्ये ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या वीरांना तिरंगा रॅली काढून मानवंदना देण्यात आली. सेना दलाच्या काही माजी अधिकाऱ्यांचा या निमित्ताने सत्कार करण्यात आला. जनतेमध्ये एकूणच लष्कराबद्दल अत्यंत कृतज्ञतेची भावना आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 18, 2025
सर्वश्री धरम… pic.twitter.com/LP4ClSTP57
तसेच माजी सैनिक कर्नल जगदीश बरसीचा, कर्नल अशोक झा, भारतीय सशस्त्र सेनेतील माजी अधिकारी बलराम रेड्डी, जगदीश सिंह, सुनील राउल, कमलेश शर्मा, भारतीय नौदलचे माजी अधिकारी मदनलाल शर्मा, भारतीय वायुदलाच्या माजी अधिकारी अंजली नेरुला सर्वश्री धरम सिंह राठी, गजानन पालवे, हरचित बरार, आणि सुभेदार चोप्रा या निवृत्त सैनिकांचा मालाड पूर्व येथील सी.ओ.डी. येथे सन्मान आणि अभिनंदन करून यात्रेचा समारोप करण्यात आला.नागरिकांनी आयोजित केलेल्या तिरंगा पदयात्रेस मोठ्या संख्येने नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.