Join us

Video : नागरिकांनो सावध राहा! झाडांखाली उभे राहू नका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 17:13 IST

पावसात भिजण्यापासून टाळण्यासाठी झाडांखाली उभे राहू नका असा इशारा आपत्कालीन विभागाकडून मुंबईकरांना देण्यात आले आहे.

ठळक मुद्दे आज सकाळपासून मुंबईत दोन ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे दोन दुर्घटना घडल्या आहेत.  मुंबई व राज्यातील मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मुंबई - गुजरातच्या किनाऱ्यावर उद्या धडकणाऱ्या वायू या चक्रीवादळाच्या आगमानची चाहूल मुंबईसह महाराष्ट्रातील किनारपट्टीला कुणकुण लागली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी सकाळपासूनच जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली आहेत. दरम्यान, पावसात भिजण्यापासून टाळण्यासाठी झाडांखाली उभे राहू नका असा इशारा आपत्कालीन विभागाकडून मुंबईकरांना देण्यात आले आहे. तसेच मुंबई व राज्यातील मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. आज सकाळपासून मुंबईत दोन ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे दोन दुर्घटना घडल्या आहेत. 

१२ आणि १३ जून रोजी महाराष्ट्रातील किनारपट्टीभागाला या वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे समुद्र किनारी जाऊ नका अशा इशारा मुंबई हवामान विभागाचे प्रमुख उप महानिदेशक (डीडीजी) के. एस. होसलीकर यांनी दिला आहे. अरबी समुद्रावर येऊ घातलेलं वायू हे चक्रीवादळ मुंबईपासून २८० किमी अंतरावर असून दक्षिण पश्चिम क्षेत्रापर्यंत ते पोहचले आहे. यामुळे महाराष्ट्रातील उत्तर किनारपट्टी भागात ताशी ५०-६० पासून ७० किमी वेगाने वादळी जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो झाडाखाली उभं राहणं टाळलं पाहिजे. 

वांद्रे येथे स्काय वॉल्कचा भाग कोसळून तीन महिला जखमी 

चर्चगेट स्टेशनजवळ होर्डिंगचा भाग कोसळून एकाचा मृत्यू

टॅग्स :वायू चक्रीवादळमानसून स्पेशलअपघात