पोलिसांच्या गणवेशात विकत होता सिगारेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 10:48 IST2023-04-13T10:48:10+5:302023-04-13T10:48:22+5:30

पोलिस कारवाईतून वाचण्यासाठी पोलिसांच्या गणवेशात सिगारेट विक्री करणाऱ्या तोतया पोलिसाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा

Cigarettes were sold in police uniform | पोलिसांच्या गणवेशात विकत होता सिगारेट!

पोलिसांच्या गणवेशात विकत होता सिगारेट!

मुंबई :

पोलिस कारवाईतून वाचण्यासाठी पोलिसांच्या गणवेशात सिगारेट विक्री करणाऱ्या तोतया पोलिसाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. अंधेरीतील एलिंग्टअन बिझनेस पार्क परिसरात लगत गस्तीवरील पोलिसांनी आरोपीच्या संशयास्पद हालचाली हेरल्या. 

पथकाने त्याच्याकडे चौकशी करताच त्याने सहायक पोलिस निरीक्षक असल्याचे भासवून उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर, तो पोलिस असल्याची बतावणी करत असल्याचे स्पष्ट होताच त्याला ताब्यात घेत कारवाई करण्यात आली आहे. कैलाश जनार्दन खामकर (४५)  असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो भीमनगर येथील रहिवासी आहे. एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत. 
 

Web Title: Cigarettes were sold in police uniform