मुंबई :बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे बनावट चकमकप्रकरणी सीआयडीने गुन्हा दाखल करायला हवा होता, असा युक्तिवाद 'न्यायालयीन मित्र' मंजुळा राव यांनी सोमवारी उच्च न्यायालयात केला.
अक्षयच्या पालकांनी तक्रार केली होती. संशय असूनही, सुरुवातीला अपघाती मृत्यू अहवाल दाखल केला. नंतर तपास राज्य सीआयडीकडे वर्ग केला, असा युक्तिवाद राव यांनी केला.
न्यायालयातील युक्तिवाद
कागदपत्रांसह एडीआर सीआयडीकडे वर्ग केल्याने कायद्याने सीआयडीने गुन्हा दाखल करायला हवा होता. तपास पुढे नेण्यास गुन्हा दाखल करणे बंधनकारक असते, असा युक्तिवाद राव यांनी केला.
शिंदेच्या पालकांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीची कुठेही नोंद नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या हाताळणीवर आणि तपासाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असेही राव यांनी न्यायालयात सांगितले.